माझ्या आईने काय म्हटले असते ? -

माझ्या आईने काय म्हटले असते ?

माझ्या आईने काय म्हटले असते ?

केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई ॲालेम्पिक स्पर्धेत शेवटच्या राउंडमध्ये धावतांना अंतिम रेषेपासुन फक्त काही मिटर दुर होता. त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते व सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते.सर्व प्रेक्षक त्याच्या नावाचा जल्लोष करीत होते.येवढ्यातच तो गैरसमजातून अंतिम रेषा समज़ुन रेषेच्या एक मिटर आधीच थांबला.त्याच्या मागुन येणार्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की चिन्ह न समजल्या मुळे तो थांबला आहे. त्याने ओरडुन अबेलला पुढे जाण्यास सांगितले पण; स्पॅनिश समजत नसल्याने तो हलला नाही.शेवटी इव्हानने त्याला ढकलुन अंतिम रेषेपर्यंत पोचविले. त्यामुळे अबेल पहिला व इव्हान दुसरा आला.पत्रकारांनी इव्हानला विचारले की तु असे का केलेस? तुला संधी असतांना तु पहिला क्रमांक का घालवलास ? इव्हानने सांगितले माझे स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानव जात बनू, जी एकमेकांना मदत करेल आणि मी पहिला क्रमांक घालविला नाही.पत्रकाराने पुन्हा प्रश्न केला कि, पण तु केनियन स्पर्धकाला ढकलुन पुढे आणलेस? यावर इव्हान म्हणाला, तो पहिला आलेलाच होता, ही रेस त्याचीच होती! पत्रकाराने पुन्हा विचारले, पण तु सुवर्ण पदक जिंकु शकला असतास! इव्हान म्हणाला, त्या जिंकण्याला काय अर्थ होता? माझ्या मेडलला मान मिळाला नसतां! माझी आई काय म्हणाली असती ? संस्कार हे पिढी दर पिढी पुढे पुढे जात असतात. मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते? दुस-यांच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईने मला दिली आहे.

धन्य ती माऊली आणि धन्य तिचे लेकरु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *