ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध कसब्यात आंदोलन -

ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध कसब्यात आंदोलन

ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध आंदोलन करताना आमदार मुक्ताताई टिळक व कार्यकर्ते

ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध कसब्यात आंदोलन
पुणे;5: पाश्चीम बंगाल मधील निवडणुकी नंतर बंगाल मध्ये भा ज पा कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत जवळपास २८ कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या हत्या झाल्या आहेत बंगाल मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सामाजिक अंतर राखत आंदोलन करण्यात आले
या वेळी बोलताना आमदार मुक्ता ताई टिळक म्हणाल्या बंगाल मधील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी च्या तीन वरून सत्यत्तर जागा आल्या आहे त्याचा राग बहुदा ममता दिदींच्या बांगलादेशी गुंडाना आला असावा बंगाल मध्ये अराजकता माजली आहे त्यामुळे ममता बॅनर्जी तसेच त्यांच्या गुंडांचा निषेध करावा तितका थोडा आहे
हे आंदोलन कसबा मतदारसंघाच्या ६ प्रभागात घेण्यात आले
या आंदोलनाचे आयोजन मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष प्रमोद कोंढरे सरचिटणीस छगन बुलाखे राजेंद्र काकडे ऍड राणी सोनवणे युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी पांडे यांनी केले या आंदोलनाला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *