साई भाविकांना श्रीं चे दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी ०७.१५ ते रात्रौ ०७.४५ यावेळेत खुले राहणार आहे. -

साई भाविकांना श्रीं चे दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी ०७.१५ ते रात्रौ ०७.४५ यावेळेत खुले राहणार आहे.

शिर्डी –

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य  शासनाने २८ मार्च २०२१ च्‍या कोवीड -१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून भाविकांना श्रीं चे दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी ०७.१५  ते रात्रौ ०७.४५ यावेळेत खुले राहणार आहे. तसेच श्री साईप्रसादालय हे सकाळी १०.०० ते रात्रौ ०७.३० यावेळेत सुरु राहील याची सर्व साईभक्तांनी नोंद घ्यावी.

  दिनांक १४ नोव्हेंबर २०२० रोजी राज्य  शासनाच्या आदेशान्वये दिनांक १६ नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. त्यांअनुषंगाने श्री साईबाबा मंदिरात गर्दी होवु नये म्हणुन संस्थानच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सध्या पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यानुसार रात्री ०८.०० ते सकाळी ०७.०० यावेळेत संपूर्ण राज्यात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे साईभक्तांना दर्शनासाठी श्री साईबाबांचे समाधी मंदिर सकाळी ०७.१५ ते रात्रौ ०७.४५ यावेळेत खुले राहणार असून रात्रौ १०.३० यावेळेत होणारी श्रीं ची शेजारती व पहाटे ०४.३० वाजताची काकड आरती नेहमीप्रमाणे होईल. परंतु याकरीता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच श्री साईप्रसादालय हे सकाळी १०.०० ते रात्रौ ०७.३० यावेळेत भाविकांकरीता सुरु असणार आहे.

  तरी सर्व साईभक्तांनी या होणा-या बदलाची नोंद घ्यावी व कोवीड -१९ संदर्भातील नियमांचे पालन करुन श्री साईबाबा संस्थानला सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published.