भारतीय प्राचीन ज्ञानाची विरासत हस्तलिखितांमध्ये लपलेली आहे -

भारतीय प्राचीन ज्ञानाची विरासत हस्तलिखितांमध्ये लपलेली आहे

पुणे शहराच्या एका कोपऱ्यामध्ये भारतीय ज्ञानपरंपरेचे संगोपन करीत असलेली एक संस्था आहे- जिचे नाव आहे श्रुतभवन संशोधन केंद्र. भारतीय प्राचीन ज्ञानाची विरासत हस्तलिखितांमध्ये लपलेली आहे. काळामध्ये विलीन होत असलेल्या हस्तलिखितांचे वाचन, अध्ययन आणि संपादन कलांना पुनर्जीवित करण्याचे काम या संस्थेद्वारे होत आहे. दिल्लीपासून ते दक्षिणेला सोलापूर पर्यंतच्या प्राचीन हस्तलिखित संग्रहातील ७५ लाख हस्तलिखित पत्रांचे स्कॅनिंग संस्थेच्या माध्यमातून झाले आहे. संस्थेच्या वर्धमान जिनरत्न कोश विभागामध्ये स्कॅनिंग नंतर ३ लाख हस्तलिखितांचे सूचीकरण सुद्धा संपन्न झाले आहे. ३६ संग्रहांचे जवळपास ४० पेक्षा जास्त सूचिपत्र तयार झाले आहेत.
संस्थेचा दुसऱ्या संशोधन विभागाद्वारे ३०० पेक्षा जास्त अप्रकाशित प्राचीन ग्रंथांचे प्रकाशन झाले आहे. त्याचप्रकारे हस्तलिखित संपादन विज्ञानाचे नियमित अभ्यास वर्ग चालतात. येथे विद्वानांना तयार केले जाते. या ज्ञानसंपदेला सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्रांवर लेझर मार्किंग करून त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थापित केले जाते. दिवाळी नंतर कार्तिक शुद्ध पंचमीचा दिवस ज्ञानपंचमी रूपात साजरा केला जातो. या दिवशी ज्ञानसंपदेची प्रदर्शनी लावली जाते. या वर्षी या प्रदर्शनी मध्ये सरस्वती देवीच्या वेगवेगळ्या मुद्रांमधील नयनाभिराम प्रतिमा, ताडपत्रांवरील चित्रांकन, वस्त्र तसेच कागदावरील चित्रांकन, ताडपत्रांच्या पेट्या, वेगवेगळ्या प्रकारच्या माळा, दुर्लभ हस्तलिखित, श्रुतभवनचे प्रकाशन तसेच लाकडाच्या विविध रचना ठेवल्या आहेत. ज्ञानाच्या समोर अक्षतांचे १०८ स्वस्तिक तसेच फळ आणि नैवेद्याची आकर्षक रचना केली आहे. विशेष उपक्रमात भारतातील सर्व लिप्यांची जननी ब्राह्मी लिपीचे पूजन केले गेले. ही प्रदर्शनी दि. ६-११-२०२२ पर्यंत ठेवली जाईल.श्रुतदीप रीसर्च फ़ाउंडेशन चे सचिव राजेन्द्र बाठिया यानि ही माहिति दिली।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *