भाजप आमदार सुनिल कांबळे यांच्या विरोधात पुणे शहर महिला काॅंग्रेस कमिटी आणि पुणे शहर जिल्हा एनएसयूआय विद्यार्थी संघटना यांचे आंदोलन -

भाजप आमदार सुनिल कांबळे यांच्या विरोधात पुणे शहर महिला काॅंग्रेस कमिटी आणि पुणे शहर जिल्हा एनएसयूआय विद्यार्थी संघटना यांचे आंदोलन


भाजप आमदार सुनिल कांबळे यांच्या विरोधात पुणे शहर महिला काॅंग्रेस कमिटी आणि पुणे शहर जिल्हा एनएसयूआय विद्यार्थी संघटना यांचे आंदोलन
भाजपा आमदार सुनिल कांबळे यांच्या विरोधात पुणे शहर महिला काॅंग्रेस कमिटी आणि एनएसयूआय विद्यार्थी संघटना यांचे आंदोलन बालगंधर्व चौकात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले.भाजप आमदार सुनिल कांबळे यांनी पुणे मनपातील वरीष्ठ महिला अधिकारीस अर्वाच भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी निषेध आणि त्या वरीष्ठ महिला अधिकारीस पाठींबा दर्शविण्यासाठी हे आंदोलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भाजपची मातृसंस्था आर. एस .एस. संघटनेच्या बौध्दीक वर्गात महिलांना दुय्यम स्थान दिले जाते असं शिकवले जाते.त्यापेक्षा बौध्दीक वर्ग बंद करून संस्कार वर्ग सुरू करा. व भाजप नेत्यांना महिलांना आदराने वागविण्याचे शिक्षण द्यावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आणि पुणे शहर महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. सोनाली मारणे याप्रसंगी म्हणाल्या. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आणि पुणे शहर महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. सोनाली मारणे आणि पुणे शहर आणि जिल्हा एनएसयूआय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री भूषण रानभरे यांच्यासह महिला काॅंग्रेस कार्यकर्त्यां सीमा महाडिक, ज्योती अरवेन,कांचन बालनायक, नलिनी दोरगे,पिता सोनावणे, सुंदर ओव्हाळ, राजश्री अडसूळ,सुरेखा बंडागळे, सोनिया ओव्हाळ, संगिता सावंत, अनिता चव्हाण,झायरा शेख,फरीदा शेख,सिंधू गायकवाड, पार्वती धायगुडे, पौर्णिमा भगत,रसिका बागवाने, कविता गायकवाड,मोती उडते,या महिला काॅंग्रेस कार्यकर्त्यां आणि केतन जाधव, राहुल सोनवणे, अभिजित कांबळे,हळदेकट, प्रसन्न मोरे,राज जाधव, प्रफुल्ल पिसाळ, अहमद शेख, विश्वास खवळे , कौस्तुभ लोखंडे हे पुणे एनएसयूआय विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *