भांडारकर रस्त्यावरील मोफत लसीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी उपस्थित मान्यवर -

भांडारकर रस्त्यावरील मोफत लसीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी उपस्थित मान्यवर

-प्रेसनोट प्रसिद्धीसाठी-
कोरोना रुग्णसंख्या कमी परंतु मागचा इतिहास विसरू नका
आमदार सिद्धार्थ शिरोळे : भांडारकर रस्त्यावरील लसीकरण केंद्राचे उद्घाटन

पुणे: संभाव्य तिसरी लाट येण्याच्या दृष्टीने पुण्याची तयारी सुरू आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. परंतु मागचा इतिहास विसरून चालणार नाही. आत्मपरीक्षण करून तिस-या संभाव्य लाटेची तयारी सुरू करायला हवी. लसीकरण मोहीम वेगाने आणि सर्वांपर्यंत पोहोचायला हवे. प्रत्येक प्रभागात ४ लसीकरण केंद्र उभी राहावीत यासाठी काम चालू आहे. सध्या १६५ लसीकरण केंद्र चालू असून २५० ते ३०० केंद्र सुरू करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले

भांडारकर रस्त्यावरील लसीकरण केंद्राचे उदघाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी नगरसेविका निलिमा खाडे, पुणे शहर भाजप उपाध्यक्ष सुनील पांडे, दत्ता खाडे, रवींद्र साळेगावकर, गणेश बगाडे, प्रतुल जागडे, संतोष लांडे, अजय दुधाने, अपर्णा कुऱ्हाडे, सुजीत गोटेकर, ओंकार केदारी, पूर्व खाडे, ओंकार बगाडे, मिलिंद टकले, ऋषिकेश आर्य, दत्तात्रय फंड, समीर हाळंदे, दिनेश अंबुरे उपस्थित होते. सुनील पांडे यांच्या विशेष प्रयत्नातून भांडारकर रस्त्यावर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट संपत आहे. तिसरी लाट येऊ नये यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यास तीसरी लाट थांबवता येणे शक्य आहे. पुण्यातील सर्व भागात नागरिकांना सोयीचे जावे यासाठी लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. नागरिकांनीही सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले.

सुनील पांडे म्हणाले, अनेक दिवस केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे व पाठपुराव्यामुळे आज भांडारकर रोड गल्ली क्रमांक १५, स्वामी विवेकानंद ई लर्निंग स्कूल येथे मोफत लसीकरण केंद्र सुरु झाले. हे लसीकरण केंद्र मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे भांडारकर रोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, कर्वे रोड, आपटे रोड, एफसी रोड तसेच संपूर्ण पुणे शहरातील नागरिकांची मोफत लसीकरणाची सोय होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.