बेस्ट टीचर अवार्ड महांडूळे यांना प्रदान -

बेस्ट टीचर अवार्ड महांडूळे यांना प्रदान

बेस्ट टीचर अवार्ड महांडूळे यांना प्रदान
आळंदी / प्रतिनिधी : इन्स्टिट्यूट प्रा.ऑफ स्कॉलर्स संस्थेकडून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करण्याऱ्या शिक्षकांना “बेस्ट टीचर अवार्ड ” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षीचा बेस्ट टीचर अवार्ड हा पुरस्कार प्राध्यापक डॉ. विकास नाना महांडूळे यांना प्रदान करण्यात आला. तसेच या संस्थेने आजीवन सभासदत्व देऊन गौरविण्यात आले आहे.
या निमिंत्ताने त्यांचे एमआयटी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
प्राध्यापक डॉ. विकास नाना महांडूळे याचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनिय आहे. गेले १३ वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्याचे संशोधन क्षेत्रातील कार्य उल्लेखनिय आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक संशोधन पेपर प्रकाशित झालेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *