बिटमेक्स तर्फे उत्पादनांच्या विस्तारीकरणासाठी स्पॉट एक्सचेन्ज लॉन्च -

बिटमेक्स तर्फे उत्पादनांच्या विस्तारीकरणासाठी स्पॉट एक्सचेन्ज लॉन्च

बिटमेक्स तर्फे उत्पादनांच्या विस्तारीकरणासाठी स्पॉट एक्सचेन्ज लॉन्च

पुणे १८ मे २०२२: जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या बिटमेक्सने किरकोळ आणि संस्थात्मक व्यापार्‍यांसाठी उत्पादनांमध्ये विस्तार करण्याच्या हेतू ने बिटमेक्स स्पॉट एक्सचेन्ज लॉन्च करण्याची घोषणा केली. कंपनीने स्पॉट एक्सचेन्ज अशा वेळी केला आहे जेव्हा डेरिव्हेटिव्ह ऑफरच्या यशानंतर कंपनी जगातील शीर्षाच्या दहा स्पॉट एक्स्चेंज मध्ये आपले स्थान बनवू पाहत आहे.

बिटमेक्स स्पॉट एक्सचेन्ज लाँच करणे बिटमेक्स च्या भारतातील क्रिप्टो व्यापार्‍यांना अत्याधुनिक उत्पादने ऑफर करण्याच्या रणनीतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल दर्शवते. एक्सचेंज सात जोड्या क्रिप्टोकरन्सीचे समर्थन करते, ज्यात बिटकॉइन, इथेरम ,चेनलिंक,युनिसव्याप, पॉलीगोन, अक्ससी इन्फिनिटी आणि अँपेकॉईन सर्व तेथरचा समावेश आहे

वापरकर्ते सेंट्रल लिमिट ऑर्डर बुक्सच्या माध्यमातून कॉइन कन्व्हर्जन रिक्वेस्ट-फॉर-कोट्स ठेवून आणि एपीआय ट्रेडिंगचा लाभ घेऊन तसेच पुढील काही आठवड्यात बिटमेक्स लाईट मोबाइलला अँप वर स्पॉट लाँच झाल्यावर, अँप द्वारे देखील व्यापार करू शकतील.

वापरकर्त्यांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून आणि बाजारातील बदलत्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून बिटमेक्स ने गेल्या वर्षी स्वतःचे पूर्णतः एकात्मिक स्पॉट एक्सचेन्ज तयार करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे ते सध्या ऑफर करत असलेल्या उत्पादनांच्या सूटला पूरक ठरेल. बिटमेक्स स्पॉट चे उद्दिष्ट नवीन किरकोळ आणि संस्थात्मक क्लायंटना प्लॅटफॉर्मवर आकर्षित करणे आणि क्रिप्टोसोबत व्यापार करताना वापरकर्त्यांना अत्याधुनिकतेने वाढण्यास मदत करेल.

बिटमेक्स स्पॉट वापरकर्त्यांना फिएट चलने आणि क्रिप्टो मालमत्ता तसेच क्रिप्टो-टू-क्रिप्टो ट्रेडिंग जोडींमध्ये व्यवहार करण्याची परवानगी देईल. बिटमेक्स त्याच्या डेरिव्हेटिव्ह उत्पादनांची विविधता निर्माण करत असताना, स्पॉट ची जोडणी कंपनीला आता प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या संपूर्ण इकोसिस्टमकडे नवीन वापरकर्त्यांना आकर्षित करण्यास मदत करेल.

बिटमेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर हॉपनर म्हणाले की गेल्या वर्षी, आम्ही आमची बियॉंड डेरीवेटीव्हस रणनीती सादर केली आणि बिटमेक्स स्पॉट लाँच करणे ही या दृष्टीचा केंद्रबिंदू आहे. आज, बिटमेक्स आमच्या वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या डिजिटल मालमत्ता खरेदी, विक्री आणि व्यापार करण्यासाठी संपूर्ण क्रिप्टो इकोसिस्टम प्रदान करण्याच्या एक पाऊल पुढे आहे. आमच्या ग्राहकांना क्रिप्टो क्रांतीमध्ये सहभागी होण्यासाठी अधिक वैशिष्ट्ये, अधिक ट्रेडिंग जोड्या आणि अधिक मार्ग प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे

Leave a Reply

Your email address will not be published.