पुण्यात प्रथमच बौद्धिक दृष्ट्या आधारित ब्रेन आणि मेमरी असा उपक्रम -

पुण्यात प्रथमच बौद्धिक दृष्ट्या आधारित ब्रेन आणि मेमरी असा उपक्रम

पुणे हे “विद्येचं माहेरघर ” .. म्हणजे पुण्यामध्ये असलेली शिक्षणसंस्था आणि इथे मिळणार उच्च दर्जाचं शिक्षणं जगप्रसिद्ध आहे !!! “पुणे मेमरी चॅम्पियनशिप” हे याच उद्दिष्टावर कार्यरत आहे, असे बौद्धिक दृष्ट्या अतिशय शक्तिशाली खेळाडू आम्हांला तयार करायचे आहेत .. ज्यांचा नावलौकिक चारही दिशांना “बौद्धिक खेळाडू ” असा करण्यातयेईल .

ब्रेन युनिव्हर्स आणि पार्किड हे एकत्र सौजन्याने असाच आगळावेगळा बौद्धिक दृष्ट्या आधारित “ब्रेन आणि मेमरी ” उपक्रम घेऊन येत आहेत .. पुण्यात प्रथमच इतक्या मोठ्ठया स्तरावर अश्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे येत्या २ ऑक्टोबर २०२२ या दिवशी, पारख हाऊस बंड गार्डन येथे . हा उपक्रम येऊ पाहत असलेल्या आपल्या नव्या पिढीला त्यांच्या मानसिक आणि बौद्धिक स्तरावर उच्च पातळी गाठण्यास नक्कीच मदतशील ठरेल. पुणे इथे शहरस्तरावर आयोजिलेल्या या “ब्रेन आणि मेमरी ” उपक्रमामुळे लहान मुलांना भविष्यात पुढची पाऊलवाट चालण्यास खूप फायदेशीर ठरेल ,एक दिशा मिळेल.

खेळ हा मुळातच खूप महत्वाचा आणि जर का तोच बुद्धी स्तरावर असेल तर सर्वांगीण अश्या बौद्धिक वाढीस झपाट्याने साथ मिळते. असेच खूप सारे बौद्धिक खेळ आणि स्पर्धा आजपर्यंत राज्य , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजिलेले आहेत .

“वर्ल्ड मेमरी चॅम्पिअनशिप ” ही अशीच एक स्पर्धा दरवर्षी मोठ्या स्वरूपात जगभरात आयोजिली जाते.. यामध्ये खूप सारे बुद्धीशी निगडीत खेळ ठेवले जातात..यामध्ये सहभाग घेतलेली मुले जास्तीत जास्त प्रमाणात स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर, स्मरणशक्तीच्या आधारे खूप सारी माहिती स्मरणात जतन करून दिलेल्या वेळेच्या मर्यादेत सादर करतात.. अश्या उपक्रमांमुळे सहभागी स्पर्धकांना आयुष्यात एक वेगळी अशी नवखी दिशा मिळते आणि पुढील वाटचालीस हातभार लागतो ..
“इंडियन मेमरी चॅम्पियनशिप ” ही अशीच एक स्पर्धा भारतात आणि राष्ट्रीय स्तरावर आयोजिली जाते.. भारतातून वेगवेगळ्या प्रादेशिक स्तरावरून मुले यामध्ये उस्फुर्तपणे सहभागी होतात.
या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेमरी चॅम्पियनशिप मध्ये त्या मानाने विद्यार्थ्यांचा मोठा वयोगट सहभागी होतो.. पण या अगदी लहान वयोगटासाठी असा उपक्रम ऐकिवात नाही..आणि मुलांची बौद्धिक, शारीरिक, मानसिक वाढ ही पहिल्या काही वर्षातच अगदी वेगाने होत असते. जर त्यांना या वयात असे एखादे व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर नक्कीच याचा सर्वांगीण विकासासाठी खूप फायदा होईल.

गेली अनेक वर्ष आम्ही याच बौद्धिक आणि मुलांची पहिली महत्वाची वर्षे यात कार्यरत आहोत आणि यावर खूप सारे प्रयोग आणि शोध चालूं आहेत . यामुळेच आम्हांला आपल्या या चिमुकल्या वयोगटासाठी काहीतरी नवखं करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच जन्म झाला “पुणे मेमरी चॅम्पियनशिप ” या उपक्रमाचा . हे व्यासपीठ आम्ही या लहान वयोगटासाठी खुले ठेवले आहे . याद्वारे मुलांना आपण बौद्धिक आणि मानसिक जोरावर आयुष्यात काय काय अवगत करू शकतो हे नक्की कळेल, याचे आयोजन च अश्या बुद्धीला चालना देणाऱ्या स्वरूपात केले आहे.

“पुणे मेमरी चॅम्पियनशिप ” या उपक्रमामुळे मुलांना पुढे जाऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अश्याच स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्यास मदत होईल..एक पाया रोवला जाईल जो पुढील वाटचालीस एक दिशा देईल .

या स्पर्धेचे खूप फायदे आहेत.जसे की,

लहान वयात इतक्या मोठ्या व्यासपीठावर स्वतःचे कलागुण दाखवण्याची संधी.
मनात खोलवर अशी एक खेळाडू वृत्ती रुजवली जाईल.
मुलांना शिकण्यास आणि शिकत राहण्यास उस्फुर्त ठेवणारा उपक्रम.
आणि आयुष्यात सगळ्यात महत्वाचा असा आत्मविश्वास आणि त्याची मुळे खोलवर नक्कीच पेरली जातील .
First ever Pune Memory Champioship as organized by Brain Universe and Parkids
Pune Memory championship was held on 2nd Oct 2022 at Parakh house, Bund garden road pune, We got overwhelming response in this championship .Founder and Direactor Brain Universe (Neha Pratap Gujar and Shalaka Kering ) Brain and memory development coach Neha Gujar , Brain Memory Development coach Shalaka Kering , Founder and director of Parkids- Madhurima and Namrata Parakh, Radio one Rj Tarun, Sanskriti school Principal Mrs. Shilpa Desai, Seceretory Of Dhole patil Education Society Mrs. Uma Dholepatil, Founder of online community Tare Zameen Par Mrs Sejal Ray, Adv. Gayati Suryavanshi Khadake, Hutchings school Counselor Arpita Gaikwad, Career Coach Mindlancer Mrs. Nidhi Bhandare.. was in invited and present their as Chief Guest .
Total 80 Kids had registered for this Pune memory championship. From age of 4- 12 yrs old kids we had age category of 4-6 yrs , 6-8 yrs old , 8-10 yrs old and 10+. Each child was apperiated by Medal and Certificate and Winners were by trophies. There were total 12 trophies given . Each age group three trophies. Champion ,1st runner up and 2d runner up.
Age 4-6 Winners:
Sharanya Gajanan Butte , Adhish Bhilare and Sara Aklokar
Age 6-8 winners:-
Riaan Shah ,Aarya Gugale and Ira
Age 8- 10:-
Riaan Jain, Jivika and Divyansh Bhutada
Age 10+:-
Aryan akolkar, Sholk yadav and Diansha Mehta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *