पुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने -

पुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने

पुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने

सत्रीय संस्कृतीतील 500 वर्षे जुनी परंपरा : आंतरराष्ट्रीय योग दिन

पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आर्ट ऑफ डान्सिंग च्या विद्यार्थ्यांनी आसामच्या सत्रीय परंपरेतील 500 वर्षे जुनी माती आखाड्यातील योगासने सादर केली. महापुरुष श्रीमंत शंकरदेव, माधवदेव आणि त्यानंतरच्या गुरुंनी सांगितलेली माती आखाड्यातील योगासने पुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली.

निसर्ग पाल्म सेंट्रल गार्डन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आसामची सत्रीय संस्कृती महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणाऱ्या प्रख्यात सत्रीय नर्तिका डॉ. देविका बोरठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही आसने केली. सान्वी फुंडकर, बिपांची बोर्ताकूर, देवश्री पाटील, अरुंधती कोंवर, अमोली धामापूरकर आणि ओशिन झाडे यांनी योगासने सादर केली.

डॉ. देविका बोरठाकूर म्हणाल्या, माती आखाडा योग ही आसामची 500 वर्षे जुनी परंपरा आहे. महाराष्ट्रीयन विद्यार्थी देखील माती आखाड्याचे अतिशय चांगल्या पद्धतीने अनुसरण करीत आहेत. सध्याच्या परिस्थितीत योगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. योग हे दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय झाले आहे. कारण ताणतणाव घालविण्यासाठी ते उपयुक्त ठरत आहे. डॉक्टर देखील त्यांच्या रुग्णांना योगासने करण्याचा सल्ला देतात.

देविका बोरठाकूर
                                                         (मो. 9373336323)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *