पुणे जिल्ह्यातील मुलांची भारत सरकार मान्य राष्ट्रीय कुडो स्पर्धा 2020-21, हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या स्पर्धेकारिता निवड -

पुणे जिल्ह्यातील मुलांची भारत सरकार मान्य राष्ट्रीय कुडो स्पर्धा 2020-21, हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या स्पर्धेकारिता निवड

हार्दिक अभिनंदन 😊👏💐

पुणे जिल्ह्यातील मुलांची भारत सरकार मान्य राष्ट्रीय कुडो स्पर्धा 2020-21, हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या स्पर्धेकारिता निवड

पुणे जिल्हा कुडो संघटना अंतर्गत पिंपरी चिंचवड शहर 2020-21 व पुणे ग्रामीण कुडो संघटना 2020-21 अश्या स्वतंत्र स्पर्धा यशस्वी रित्या पार पडल्या. सदर स्पर्धेकारिता मा. मेहुल वोरा (अध्यक्ष – कुडो इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ इंडिया), मा. जस्मिन मकवाना (सचिव – कुडो असोसिएशन महाराष्ट्र) व पुणे जिल्हा कुडो संघटना अध्यक्ष मा. अरविंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुळी, ता. खेड, चाकण येथे स्पर्धा पार पडल्या.

सदर स्पर्धेत प्रमुख पाहूणे म्हणून मा. शाम भोसले (अध्यक्ष – युवा आधार संस्था, महाराष्ट्र राज्य), मा. प्रविण मेळावणे (अध्यक्ष – पिंपरी चिंचवड कुडो संघटना) मा. राहुल पवार (सचिव – पिंपरी चिंचवड कुडो संघटना) मा. सुहास धाइंजे (अध्यक्ष – पुणे ग्रामीण कुडो संघटना) उपस्थित होते

सदर स्पर्धा विजयी विध्यार्थी यांची कुडो राज्य स्तर स्पर्धा 2020-21 साठी एकूण 42 जणांची निवड झाली आहे.

सदर जिल्हा स्पर्धेत शीतल मोरे, राकेश यादव, हिमाली वहाळकर, लेखा लोखंडे, श्रुती सुर्वे व गीता पाटील यांनी कुडो स्पर्धेत KIFI चे अधिकृत रेफ्री व जुरी म्हणून काम पहिले.

क्रीडा व युवक सेवा संचनालय, भारत सरकार द्वारा अधिकृत राष्ट्रीय कुडो स्पर्धा 2020-21, हिमाचल प्रदेश येथे 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी सदर विजयी विद्यार्थ्यांमधून अंतिम निवड केली जाणार आहे.

धन्यवाद..
अरविंद मोरे
अध्यक्ष – पुणे जिल्हा कुडो संघटना
अध्यक्ष – पुणे जिल्हा निप्पोण बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *