पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणा-या अत्याचाराचा निषेध विश्व हिंदू परिषदेच्यावतीने शांततामय वातावरण निषेध व्यक्त -

पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणा-या अत्याचाराचा निषेध विश्व हिंदू परिषदेच्यावतीने शांततामय वातावरण निषेध व्यक्त

विश्व हिंदू परिषद पुणेच्यावतीने शुक्रवार पेठेतील भारत भवन च्या आवारात पश्चिम बंगाल येथील हिंदूंवर होणाºया अत्याचाराचा निषेध करण्यात आला. या वेळी हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणा-या अत्याचाराचा निषेध
विश्व हिंदू परिषदेच्यावतीने शांततामय वातावरण निषेध व्यक्त

पुणे : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचाराला सुरुवात झाली. यामध्ये हिंदू कार्यकर्त्यांना व त्यांच्या घरांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. कित्येक निरपराध कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या झाली. याचा निषेध विश्व हिंदू परिषद पुणेच्यावतीने करण्यात आला. यावेळी मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.

शुक्रवार पेठेतील भारत भवनच्या आवारात शांततामय वातावरणात हा निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी विश्व हिंदू परिषदेचे संजय मुद्राळे, पुणे विभाग मंत्री तुषार कुलकर्णी, आशिष कांटे, नाना क्षीरसागर, प्रतीक गोरे, अनंत शिंदे, राजेश जाधव, गजानन वाघ, निखिल कुलकर्णी, श्रीराम पारखी, कृष्णकांत चांडक उपस्थित होते.

तुषार कुलकर्णी म्हणाले, निकोप निवडणुका हाच लोकशाहीचा गाभा आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर लोकशाहीचा कोणताच विधिनिषेध पाळला गेला नाही. हिंदू कार्यकर्त्यांना व त्यांच्या घरांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. कित्येक निरपराध कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या झाली. महिलांवरही अमानुष अत्याचार झाले. हिंदू कुटुंबांची घरे लुटण्यात आली त्यांना बेघर करण्यात आले. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने आम्ही आवाहन करतो की अशी देशविघातक कृत्य करणाºया समाजकंटकांना तात्काळ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत.

Leave a Reply

Your email address will not be published.