नावीन्याच्या शोधात असलेल्या तरुणांसाठीच्या एज्यु-टेक प्लॅटफॉर्म ब्रिक ईटीसीचे स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्घाटन -

नावीन्याच्या शोधात असलेल्या तरुणांसाठीच्या एज्यु-टेक प्लॅटफॉर्म ब्रिक ईटीसीचे स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्घाटन

नावीन्याच्या शोधात असलेल्या तरुणांसाठीच्या एज्यु-टेक प्लॅटफॉर्म ब्रिक ईटीसीचे स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे १८ मे २०२२ : तरुण आणि नावीन्याच्या शोधात असलेल्यांना अल्प-मुदतीच्या अभ्यासक्रमांद्वारे विविध सर्जनशील क्षेत्रांची झलक देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ब्रिकईटीसी कंपनीच्या हायब्रीड एज्यु-टेक प्लॅटफॉर्मचे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते १६ मे २०२२ रोजी उद्घाटन करण्यात आले. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून योग्य वयात विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध करून देण्यात येतात. सर्जनशील शिक्षण सर्वांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्याच्या या प्रयत्नाबद्दल इराणी यांनी ब्रिकईटीसी्च्या टीमचे अभिनंदन केले.यावेळेस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि एसएमईएफच्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाइनच्या अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.

हा प्लॅटफॉर्म बदलत असलेल्या शिक्षाणापासून क्रिएटिव्ह लर्निंगकडे वाटचाल करीत असलेल्या विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होण्यापूर्वी त्यांची क्षमता तपासण्यात मदत करेल. ब्रिकईटीसीच्या माध्यमातून जगातील विविध पर्यायांमधून योग्य पर्यायांची निवड करण्यासाठी, वेबसाइट आणि अँप वरील त्यांच्या अनुभवावर आधारित माहितीपूर्ण निवड करण्यासाठी क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन देणे, हा या प्लॅटफॉर्म उद्देश आहे. त्यातून विद्यार्थी त्यांच्या आकांक्षा, कौशल्य आणि भविष्यातील उद्दिष्टांशी जुळणारे करिअर निवडतील. ब्रिकईटीसीने अँनिमेशन, ग्राफिक डिझाइन, आर्किटेक्चर, फिल्म मेकिंग, फोटोग्राफी, फॅशन डिझायनिंग असे २० हून कोर्स उपलब्ध करून दिले आहे. हे प्लॅटफॉर्म नवीनतम उद्योग ट्रेंड आणि आवश्यकतांनुसार अभ्यासक्रम अपडेट करत राहील.

ह्या प्लॅटफॉर्म च्या प्रत्येक कोर्समध्ये ४ मुख्य घटक असतात. ज्यात रेकॉर्ड केलेली सत्रे, विद्यार्थ्यांनी पूर्ण करायचे टप्पे , थेट प्राध्यापकांशी संवाद आणि समुपदेशन सत्र यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना सत्रांमध्ये उपस्थित राहण्याची आणि त्यांच्या गतीने कार्ये करण्यासाठी संधी देण्यात येते. तसेच त्यांना तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी देते. अभ्यासक्रमाच्या शेवटी, समुपदेशकांचे मौल्यवान मार्गदर्शन मिळते. लहान वयातच मुलांची सर्जनशील क्षमता भविष्यात ज्या व्यवसायाची त्यांना आवड आहे अशा व्यवसायात रूपांतरित होण्याच्या मार्गात यामुळे सोपेपणा येईल .या प्लॅटफॉर्मवरील सर्व अभ्यासक्रमांची माहिती ब्रिक ईटीसी या अँपवर उपलब्ध आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की पुण्याच्या स्थानिक आयटी कौशल्यामुळे प्रत्येकासाठी सर्जनशील शिक्षण शक्य झाले आहे. याद्वारे मला देशातील भविष्यातील प्रतिभांबद्दल आशा आहे. हा प्लॅटफॉर्मचे म्हणजे देशाच्या शिक्षण व्यवस्थेत झालेली एक अविश्वसनीय उत्क्रांती आहे. ब्रिकईटीसी विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशील संवेदना मुक्त करण्यात आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करेल.”

ब्रिकईटीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा मिसाळ म्हणाल्या की ब्रिकईटीसी सुरू करण्यामागे माझा हा मूळ उद्देश होता की उच्च शिक्षणाचे क्षेत्र निवडताना पालक आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ दूर करण्यासाठी मी दहा वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या विद्यार्थ्यांचे ब्रिकईटीसीसह त्यांच्या आवडी शोधण्यासाठी येण्यासाठी आमंत्रित करते. ‘ब्रिकईटीसी’ हे एक असे ठिकाण आहे जिथे कलात्मक आणि साहसी विद्यार्थी शिकतात आणि शिकत असताना आनंद मिळतो. या सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की, या प्रवासात विद्यार्थी एकटे नसतात. प्रत्येक टप्प्यावर आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्यांना तज्ञांच्या टिमकडून मार्गदर्शन दिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.