नागरिकांनी आपली आणि सर्वांची काळजी घ्यावी -

नागरिकांनी आपली आणि सर्वांची काळजी घ्यावी

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आहे याला आळा घालण्यासाठी शासनाच्या वतीने काही कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत त्यासोबतच लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे या सर्व गोष्टींमध्ये हॉस्पिटल मध्ये जागा शिल्लक नाही ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे पेशंटला आवश्यक असणारी रेमडेसिविर इंजेक्शन देखील उपलब्ध होत नाहीये या सर्व गोष्टी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे महाराष्ट्र संघटक संतोष जगताप आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन बोराटे यांनी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासमोर हे सर्व प्रश्न मांडले यावेळी सौरभ राव यांनी सांगितले की आता ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यावरही भर दिला जात आहे तसेच रेमडेसिविर इंजेक्शन हे देखील पेशंटला हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे केंद्र सरकारने इंजेक्शन निर्यात थांबवल्यामुळे प्रमुख पाच कंपन्यांचे रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होण्यास आणखी मदत होणार आहे नागरिकांना हे इंजेक्शन मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे याविषयी नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी बोलून दाखवल्या

Leave a Reply

Your email address will not be published.