"दे दे प्यार दे" कार्यक्रमास पुणेकर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त राजेशाही प्रतिसाद -

“दे दे प्यार दे” कार्यक्रमास पुणेकर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त राजेशाही प्रतिसाद

महान गायक किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त पराग मेलडीज व हॉटेल राजेशाही प्रस्तुत श्रावी मीडिया अँड फिल्म प्रॉडक्शन यांच्या विशेष सहकार्याने आयोजित “दे दे प्यार दे” कार्यक्रमास पुणेकर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त राजेशाही प्रतिसाद
पुणे – महान गायक किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त पराग मेलडीज व हॉटेल राजेशाही प्रस्तुत श्रावी मीडिया अँड फिल्म प्रॉडक्शन यांच्या विशेष सहकार्याने आयोजित” दे दे प्यार दे “कार्यक्रमाचे नुकतेच पुण्यातील पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, वुमेन्स मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स सिओल,साऊथ कोरियाच्या विजेत्या,लाइफ कोच व फॅशन मॉडेल डॉ.प्रचिती पुंडे उपस्थित होत्या.या कार्यक्रम प्रसंगी धायरी गावच्या प्रथम महिला माजी सरपंच सुरेखा दमिष्टे, दे दे प्यार दे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक व हॉटेल राजेशाही हिंजेवाडी व धायरी शाखेचे संचालक निलेश दमिष्टे, पराग मेलडीजचे संचालक व गायक पराग क्षीरसागर, नमिता क्षीरसागर, श्रावी मीडिया अँड फिल्म प्रॉडक्शनचे संचालक विवेक कुमार तायडे, श्रावी मीडिया अँड फिल्म प्रॉडक्शनचे व्यवस्थापक व गायक प्रशांत निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात मेघराज राजे भोसले म्हणाले की” किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त पराग मेलडीज व हॉटेल राजेशाही यांच्यातर्फे आयोजित केलेल्या हिंदी सुमधुर गीतांचा कार्यक्रम हा उपक्रम चांगला आहे.कलावंतांना मदत व्हावी व त्यांची कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी असा पराग मेलडीज व हॉटेल लोकशाहीचा स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनाने नवीन गायक घडतील. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे संगीताचा आनंदही प्रेक्षकांना घेता येईल”


आपल्या भाषणात डॉ. प्रचिती पुंडे म्हणाल्या की,”या पराग मेलडीज व हॉटेल राजेशाहीच्या म्युझिक कॉन्सर्ट मुळे मी आनंदी होते. खूप छान गाण्याचा संगम इथे पाहायला व ऐकायला मिळाला. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आराम करायला विसरून जातो. त्यासाठी थोडे आपल्याला थांबण्याची गरज असते. पुढची झेप घेण्यासाठी दोन पावले मागे येण्याची गरज असते. त्यामुळे स्वतःसाठी अशा संगीतमय कार्यक्रमांची गरज असते
आपल्या भाषणात सुरेखा दमिष्टे म्हणाल्या की, ” दे दे प्यार दे या कार्यक्रमाद्वारे नवीन गायकांना निलेश या माझ्या मुलाने संधी दिली हे पाहून मला माझ्या केलेल्या कार्याचे मुलांनी पांग फेडले. अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन नवीन कलाकारांना उभारी दिली पाहिजे व मोफत शो ठेवून रसिकांनाही आनंद दिला पाहिजे.
आपल्या भाषणात निलेश दमिष्टे म्हणाले की, ‘हॉटेल राजेशाही हा ब्रँड कलाकारापर्यंत पोहोचावा व कलाकार त्यातून तयार व्हावेत या दृष्टीने केलेले हे प्रामाणिक सहकार्य होते. जसे अस्सल स्वादिष्ट व तब्येतशीर पदार्थ आम्ही राजेशाही हॉटेलमध्ये जेवणात देतो, तसेच दमदार कलाकार तयार व्हावेत अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही प्रायोजकत्व दिले आहे.
पराग मेलडीजचे संचालक व गायक पराग क्षीरसागर म्हणाले की, ” पराग मेलडीज तर्फे लाईव्ह म्यूझिशनसह नवनवीन संकल्पनांचा म्युझिक शो आयोजन करत असतो. पराग मेलडीज तर्फे चांगल्या. कलाकारांना आम्ही संधी देत असतो. त्यामुळे आम्ही यापुढेही असेच दर्जेदार शो आयोजित करणार आहोत.


या संगीत रजनी मध्ये पराग क्षीरसागर , निवेदिता दत्ता, लता रामप्रसाद, स्नेह राम,संगीता राजपाठक, शिल्पा ढवळे, वैशाली लुपणे , प्रशांत निकम,आदिती खटावकर, दीपक मुदलियार, संदीप राक्षे, पांडुरंग मोटे, अभिनव रंगनाथन या गायक गायिकांनी आपली बहारदार गीते सादर केली. या कार्यक्रमांमध्ये चांद ने कुछ कहा, वो खई के पान बनारस वाला, रंगीला रे, मै हु डॉन, तेरे चेहरे में वो जादू है, नखरेवाली,हवा हवाई,ये मेरा दिल प्यार का दीवाना, मौसम मस्ताना, गुम है किसी के प्यार में, इम्तिहा, हो गई इंतजार की, जाने जा ढूंढता फिर रहा, मेरे सपनो की रानी ही सदाबहार गीते गायकांनी सादर केली. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रवीण पोतदार यांनी केले.या कार्यक्रमामध्ये आसिफ खान, बाबा खान, सिद्धार्थ पाठक, प्रकाश गुप्ते, झाकीर हुसैन या मुसिकयन्सनी संगीत दिले.या कार्यक्रमाचे स्थिर चित्रण नागेश झलकी,छायाचित्रण केदार कुलकर्णी, प्रकाशयोजना विजय चेंनूर, ध्वनीयोजना मल्लेश गंगराई यांनी केले होते. या कार्यक्रमामधील गायक व म्युझिशियनन्सनी आपली कला उत्कृष्टपणे सादर केली.या कार्यक्रमास पुणेकर प्रेक्षकांनी उत्स्फूर्त राजेशाही प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.