दिग्गज पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांचा 70 वा वाढदिवस जल्लोषात साजरा - दिपकभाऊ मानकर -

दिग्गज पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांचा 70 वा वाढदिवस जल्लोषात साजरा – दिपकभाऊ मानकर

दिवा फौंडेशन व मैत्री म्युजिक आयोजित ” होगा तुमसे प्यारा कोन ” या कार्यक्रमात दिवा फॉउंडेशन तर्फे पं. शौनक अभिषेकी यांच्या हस्ते व आयोजक दीपक मानकर यांच्या उपस्थतीत रंगबिरंगी फेटा, शॉल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्न व रोख रुपय ५१,००० /- देऊन सन्मान करण्यात आले. या प्रसंगी दिवा फौंडेशनचे करण मानकर, हर्षवर्धन मानकर, अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, संदीप पाटील, दत्ता सागरे इत्यादी.

बालगंधर्व, पुणे :
दिवा फौंडेशन व मैत्री म्युजिक आयोजित ” होगा तुमसे प्यारा कोन ” या कार्यक्रमात बहारदार गीतांच्या ऑर्केस्ट्राचे दीपकभाऊ मानकर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे पंडित शौनक अभिषेकी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
९ ऑक्टोबर या दिनी दिग्गज पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांच्या जन्मदिवशी पुणेकरांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव पाहण्यात आला.
दिग्गज पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांनी गायलेली प्रसिद्ध गाणी प्रसिद्ध गायक संदीप पाटील व त्यांच्या टीमतर्फे सादर करण्यात आली. पुणेकर प्रेक्षक व शैलेंद्र सिंग यांच्या चाहत्यांनी बालगंधर्व सभागृहात प्रत्येक गाण्यांवर टाळ्यांचा कडकडाट व ” वन्स मोर ” ची फरमाईश वारंवार ऐकण्यास येत होती.
दिग्गज पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांचा ७० वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. दिवा फौंडेशनचे करण मानकर, हर्षवर्धन मानकर, अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, दत्ता सागरे यांच्या उपस्थितीत गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.
उपस्थित सर्व प्रेक्षकांनी दीपकभाऊ मानकर यांना एकात दोन गानी गान्याची विनंती केली, त्यावरून मानकर यांनी ” मै शायर तो नहीं ” …. ” झूट बोले कव्वा काटे ” ही गाणी सादर केली. या गाण्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
प्रख्यात अभिनेता व निर्माता, निर्देशक राज कपूर यांनी दिग्गज पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांना पहिल्यांदा बॉबी या चित्रपटात गाण्याची संधी दिली व तिथून संपूर्ण जगात त्यांचे नावलौकिक व प्रसिद्ध झाले. मुळात त्यांना अभिनेता होण्याचे स्वप्न होते पण राज कपूर यांनी त्यांना गाणे गाण्याची संधी दिली व उत्कृष्ट गायक ची छबी सर्व श्रोत्यांवर पडली. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटात गाण्याची संधी मिळत गेली.
शैलेंद्र सिंग यांची सुमारे २०० हुन अधिक गाणी प्रसिद्ध झाली व लाखों लोकांच्या हृदयात स्थान प्राप्त केले.
दिवा फौंडेशन च्या वतीने दिग्गज पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांना प्रमुख पाहुणे शौनक अभिषेकी ( भारतीय गायक ) यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे आयोजक दिपकभाऊ मानकर यांच्या उपस्थितीत ७० वा वाढदिवसाचे औचित्य साधून रंगबिरंगी फेटा, शॉल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्न व रोख रुपय ५१,००० /- देऊन सन्मान करण्यात आले. या प्रसंगी दिवा फौंडेशनचे करण मानकर, हर्षवर्धन मानकर, अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, संदीप पाटील, दत्ता सागरे व्यासपीठावर उपस्थतीत होते.
पुरस्कारार्थी श्री शैलेंद्र सिंग यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, आज या कार्यक्रमातून माझा अनेक जुनी आठवणी ताजा झाल्या. अनेक संघर्षातून मी या मुकामपर्यंत पोचलो. मी गायलेली सर्व गाणी सुपर हिट झाले, याचा मला खूप आनंद होत आहे. मला अभिनेता होण्याचे स्वप्नहोते पण देवाच्या मनात काही वेगळेच होते. देवाने मला गायक बनविले व लाखों लोकांनी माझ्या आवाजाला पसंद केले. दीपक मानकर यांच्यासारखा एक दिलदार मित्र मला मिळाला, मी सदैव या सर्वांच्या हृदयात राहणे पसंद करेन. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दीपकभाऊ मानकर यांनी केले. तर सर्वांचे आभार हर्षवर्धन मानकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *