त्रैलोक्य विजया वटी - एक वेदनाशामक संशोधन प्रकल्पाचे अनावरण -

त्रैलोक्य विजया वटी – एक वेदनाशामक संशोधन प्रकल्पाचे अनावरण


त्रैलोक्य विजया वटी – एक वेदनाशामक संशोधन प्रकल्पाचे अनावरण
हेम्प स्ट्रीट आणि डॉ.कामठे पाईल्स क्लिनिक  यांच्यावतीने राज्यस्तरीय वैद्यकीय सेमिनारचे आयोजन
मान्यवर डॉक्टरांच्या व्याख्यानाचे आयोजन

पुणे : हेम्प स्ट्रीट आणि डॉ.कामठे पाईल्स क्लिनिक  यांच्यावतीने  त्रैलोक्य विजया वटी चा एक वेदनाशामक म्हणून वापर या संशोधन प्रकल्पाचे अनावरण होणार आहे. यावेळी विविध डॉक्टरांनी केलेल्या निरीक्षणात्मक अभ्यासाचे सादरीकरण होणार आहे. शनिवार, दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता  पुणे रेल्वे स्थानकाजवळील लेमन ट्री प्रीमिअर, सिटी सेंटर येथे या वैद्यकीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
क्षारकर्म , क्षारसूत्र उपचारानंतर रुग्णांमध्ये पोस्ट-ऑपरेटिव्ह वेदनांमधे त्रैलोक्य विजया वटीच्या विश्लेषणात्मक प्रभावाचे मूल्यांकन-एक निरीक्षणात्मक अभ्यास या विषयावर संशोधकांच्या अभ्यासाचे यावेळी सादरीकरण होणार आहे.
यावेळी डॉ. कुणाल कामठे, डॉ. विक्रांत पाटील, डॉ. अनिरुद्ध मोहिते, डॉ.नीरज कामठे,वैद्य  सुकुमार सरदेशमुख, श्रेय जैन,डॉ.महेश संघवी डॉ.मिलिंद भोई, डॉ. योगेश्वर पवळे, डॉ. आशुतोष गुप्ता, डॉ. ओमकार कुलकर्णी, आदी डॉक्टर या सेमिनारमध्ये बोलणार आहेत.
श्रेय जैन म्हणाले, हेम्प स्ट्रीटच्या त्रैलोक्य विजया वटीच्या सुरक्षिततेचे आणि प्रभावीतेचे मूल्यमापन करण्यासाठी सध्याचा अभ्यास आयोजित करण्यात आला आहे, जे गुदगत  शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांच्या तुलनेत वेदनाशामक म्हणून उपयोगात आणले  आहे. या वेळी पुणे आणि मुंबईतील डॉक्टरांचे व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *