तुर,मुग,उडीद डाळ कडधान्याची आयात करू नये या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहारचे टाळी-थाळी बजाव आंदोलन -

तुर,मुग,उडीद डाळ कडधान्याची आयात करू नये या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहारचे टाळी-थाळी बजाव आंदोलन

तुर,मुग,उडीद डाळ कडधान्याची आयात करू नये या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहारचे टाळी-थाळी बजाव आंदोलन ..

जसे टाळी व थाळी वाजून कोरोना जाते सरकार म्हणाले होते. त्याच धर्तीवर प्रहार संघटनेच्या वतीने टाळी-थाळी वाजून तुर,मुग,उडीद आयात बंद करा व आमची मागणी मान्य करा,असे आवाहन पंतप्रधान यांना वाघोली येथे प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आले.
देशात 38 लाख टन तूर डाळ उत्पन्न होणार आहे. 7 लाख टन तूर डाळ शिल्लक आहे, एकूण 45 लाख टन तूरडाळ देशात असणार आहे. देशाला 43 लाख टन तूरडाळीची आवश्यकता असून 2 लाख टन तूर डाळ शिल्लक राहणार आहे. असे असताना केंद्र सरकार 8 लाख टन तुर आयात करणार आहे. हे कशासाठी? काय आवश्यकता आहे? कोणाच्या फायद्यासाठी केंद्रसरकार तुर आयात करीत आहे?. तूर डाळ आयातीमुळे भारतातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे व नुकसान होणार आहे. ही आयात केंद्राने त्वरित थांबवावी, याकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी व निषेध करण्यासाठी वाघोली येथे प्रहार संघटनेच्या वतीने टाळी-थाळी वाजून वाघोली केसनंद फाटा येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी धर्मेंद्र सातव,ज्ञानदेव मेहेत्रे,सुप्रिया लोखंडे,.बायक्का वाघमोडे.नंदू कोळेकर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *