ड्राईव्ह इन लसीकरण सुविधा पुण्यात तात्काळ सुरु करा- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहरची मागणी -

ड्राईव्ह इन लसीकरण सुविधा पुण्यात तात्काळ सुरु करा- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहरची मागणी


ड्राईव्ह इन लसीकरण सुविधा पुण्यात तात्काळ सुरु करा
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहरची मागणी ; अति ज्येष्ठ, विकलागांकरीता वेगळे लसीकरण केंद्र हवे

पुणे : कोविडच्या तिस-या लाटेच्या अगोदर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. मात्र, लसींचा तुडवडा असल्याने लसीकरणात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अति ज्येष्ठ, विकलांग, दृष्टीहिन नागरिकांसाठी वेगळे लसीकरण केंद्र सुरु करायला हवे. तसेच पुणेकरांसाठी ड्राईव्ह इन लसीकरणाची सुविधा तात्काळ सुरु करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहरतर्फे करण्यात आली.

ओबीसी मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष योगेश पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी ओंकार माळवदकर, शंतनू नारके, यशोधन आखाडे, बंडू कचरे, विशाल केदारी, दिनेश रासकर, विकास पवार आदींनी मागणीचे निवेदन दिले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर यांना हे निवेदन देण्यात आले. यावर त्वरीत कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

योगेश पिंगळे म्हणाले, कोविडच्या लसीकरणासाठी ड्राईव्ह इन लसीकरणाची सुविधा पुण्यामध्ये देखील सुरु करणे आवश्यक आहे. पुण्यामध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असताना तिस-या लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे किमान अति ज्येष्ठ, विकलांग दृष्टीहिन नागरिकांसाठी वेगळे लसीकरण केंद्र सुरु करणे गरजेचे आहे. लवकरात लवकर प्रशासनाने ही सुविधा सुरु करावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *