डोनेट एड सोसायटी अध्यक्ष सारिका कृष्णा भंडलकर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन -

डोनेट एड सोसायटी अध्यक्ष सारिका कृष्णा भंडलकर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन

माननीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डोनेट एड सोसायटी अध्यक्ष सारिका कृष्णा भंडलकर यांनी बुद्धघोष बुद्ध विहार, बुद्ध घोष सोसायटी याठिकाणी ब्लड कनेक्ट फाऊंडेशन आणि शिवामृत सहयोग समूह यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे शहीद वीर पत्नी मंगल ताई साळुंके यांनी उद्घाटन केले. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉक्टर सतीश कांबळे, सिनेट सदस्य संतोष ढोरे, नगर सदस्य हर्षल ढोरे,संतोष कांबळे तसेच कृष्णकांत चांडक, तृप्ती ताई कांबळे, भाजपा युवती अध्यक्ष सोनम गोसावी, पत्रकार संजय मराठे, प्रीती श्रीवास्तव, सौरभ डोलारे, पीएसआय ब्लड बँक चे डॉक्टर अरुण पाटील, मारुती मोहिते,श्री शरद जांभूळकर, श्री रणदिवे श्री प्रताप भोसले ,स्मिताताई आदी मान्यवर उपस्थित होते. एकूण 28 रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले .या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाजपा प्रभाग अध्यक्ष कृष्णा भंडलकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *