‘टीसीएस आयॉन’तर्फे व्यावसायिक शिक्षणासाठी नवीन फिजिटल मॉडेल विकसित -

‘टीसीएस आयॉन’तर्फे व्यावसायिक शिक्षणासाठी नवीन फिजिटल मॉडेल विकसित

पुणे ,१६ जुलै २०२१ : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या ‘टीसीएस आयॉन’ने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त व्यावसायिक शिक्षणातील नाविन्यपूर्ण फिजिटल मॉडेलचा एक भाग म्हणून शैक्षणिक, कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज, तसेच प्रकाशक आणि ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स यांच्या परिसंस्थेला एकत्र आणले आहे. ज्या शिक्षणार्थींना आपल्या कौशल्यांमध्ये वाढ करावयाची आहे, त्यांच्यासाठी वर्धित शैक्षणिक सामग्री, विविध अनुभव आणि निष्कर्ष या बाबींना ही परिसंस्था चालना देणार आहे.

‘टीसीएस आयॉन’ ही जागतिक आयटी सेवा, सल्ला सेवा आणि व्यावसायिक तोडगे या क्षेत्रातील आघाडीची संस्था आहे.‘टीसीएस आयॉन’ने ‘टाटा स्ट्राइव्ह’, ‘नेट्टर टेक्निकल ट्रेनिंग फाऊंडेशन’ आणि ‘अपोलो मेड स्किल्स’ यांच्यासह व्यावसायिक शिक्षणात सखोल कौशल्य असणार्‍या व्यक्तींची एक मोठी परिसंस्था विकसीत केली आहे. त्यात ‘ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल’ या संस्थेचादेखील समावेश आहे.‘एएसडीसी’ने ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी प्रोग्राम विकसित करण्यासाठी ‘टीसीएस आयॉन’ला सहकार्य देऊ केले आहे.‘

टीसीएस आयॉन’चे व्यावसायिक शिक्षणाचे मॉडेल हे २०२० मधील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी संलग्न आहे.३ तासांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमापासून ३ वर्षांच्या क्रेडिट-आधारित उद्योग पदवीपर्यंत शिक्षणाचे अनेक प्रोग्रॅम या मॉडेलमध्ये आहेत. शैक्षणिक प्रोग्रॅम्सव्यतिरिक्त, या मॉडेलमध्ये मूल्यांकन उत्पादने, मूल्यांकन सेवा, तसेच आयटीआय, पॉलिटेक्निक व कौशल्य विकास संस्था, सरकारी व खासगी क्षेत्रांसाठी कौशल्य विकासास चालना देणाऱ्या नोडल संस्था व परिसंस्था निर्माते यांसारख्या कौशल्य प्रदात्यांसाठीच्या प्लॅटफॉर्म सोल्यूशन्सचा समावेश आहे.

‘टीसीएस आयॉन’च्या शैक्षणिक आराखड्यात मल्टीमोडल डिजिटल शिक्षण संसाधने, लाईव्ह ऑनलाइन व्याख्याने, गेमिफिकेशन पद्धतीने शिक्षण आणि सिम्युलेशन-आधारित असलेल्या फिजिटल मॉडेल मध्ये दहा अभिनव शैक्षणिक घटक आहेत. यातील सहभागींना प्रकल्पाची कामे प्रत्यक्ष मिळविण्यात देशभरातील प्रत्यक्ष शिक्षण व सराव केंद्रे मदत करतील आणि या सहभागींना उद्योगासाठी प्रभावीपणे तयार करतील. हे मॉडेल चालविणारा ‘टीसीएस आयॉन डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म’ हा एक महत्त्वाचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. सुमारे १ कोटी २७ लाखांहून अधिक जण हा प्लॅटफॉर्म वापरतात 

 टीव्हीएस आयॉन’चे जागतिक प्रमुख वेंगुस्वामी रामास्वामी म्हणाले कि भारतीय तरुणांना त्यांचे कौशल्य सातत्याने वाढविण्यात आणि नोकरीसाठी सज्ज होण्यात मदत करण्याचे आमचे ध्येय आहे. त्याकरीता आम्ही आमचे सखोल डोमेन ज्ञान व तंत्रज्ञानातील कौशल्ये वापरतो. तसेच आमच्या नेटवर्कमधील भागीदारांसोबत काम करून शिकण्याच्या पद्धतींचा पुनर्विचार  करत आहोत . तसेच भारतातील प्रत्येक जिल्ह्यातील कॅम्पसपलिकडील विद्यार्थ्यांना उद्योगांशी संलग्न अनुभवांचे वितरण करण्यास उत्सुक आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *