टीव्ही सेलिब्रिटी करण ग्रोवर व अभिनेता आणि कोरिओग्राफर हनीफ हिलाल यांच्या उपस्थितीत 'स्टुडिओ वर्क्स' चा उद्घाटन सोहळा संपन्न -

टीव्ही सेलिब्रिटी करण ग्रोवर व अभिनेता आणि कोरिओग्राफर हनीफ हिलाल यांच्या उपस्थितीत ‘स्टुडिओ वर्क्स’ चा उद्घाटन सोहळा संपन्न

टीव्ही सेलिब्रिटी करण ग्रोवर व अभिनेता आणि कोरिओग्राफर हनीफ हिलाल यांच्या उपस्थितीत ‘स्टुडिओ वर्क्स’ चा उद्घाटन सोहळा संपन्न

डान्स प्रशिक्षण आणि म्युझिकच्या विविध सेवा पुणेकरांना मिळणार एकाच छताखाली

पुणे : म्युझिक स्टुडिओ, डान्स स्टुडिओ, कॅरि ओके सेटअप आणि म्युझिक क्लासेस आता पुणेकरांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. डान्स आणि म्युझिक उपक्रमांसाठी सर्व सोईयुक्त वन स्टॉप डेस्टीनेशन असलेल्या स्टुडिओ वर्क्स’चे उद्घाटन आज करण्यात आले. टीव्ही सेलिब्रिटी करण ग्रोवर व अभिनेता आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर हनीफ हिलाल यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी ‘स्टुडिओ वर्क्स’ ला जहांगीर दोराबजी, विशाल आरोरा, अनिल काकडे, नरेंद्र चव्हाण, महेश मिश्रा आदी उपस्थित होते. ‘स्टुडिओ वर्क्स’ची पहिली शाखा एन आय बी एम रोड येथील रॉयल हेरीटेज मॉल येथे सुरू झाली आहे.

यावेळी बोलताना ‘स्टुडिओ वर्क्स’चे विशाल आरोरा म्हणाले, संगीत हे एका औषधा प्रमाणे असते, असे बोलले जाते. करोनाच्या काळात तर हे शब्दशः खरे ठरले आहे. हीच गोष्ट लक्षात ठेऊन आम्ही ‘स्टुडिओ वर्स’ सुरू केला आहे. हे एक ‘वन स्टॉप डेस्टीनेशन’ असणार आहे.

‘स्टुडिओ वर्क्स’ बद्दल माहिती देताना विशाल आरोरा म्हणाले, ‘स्टुडिओ वर्क्स’ येथे डान्स स्टुडिओ आणि म्युझिक स्टुडिओ असे दोन विभाग असणार आहेत. डान्स स्टुडिओमध्ये हिपॉप, कंटेंपररी, झुंबा, बॉलीवूड आदी डान्स फॉर्मस प्रशिक्षित व अनुभवी प्रशिक्षकांकडून शिकविले जाणार आहेत. तसेच महिन्यातून एक वेळा सेलिब्रिटी डान्स ट्रेनर कडून मार्गदर्शन केले जाणार आहे. भविष्यात भारतीय शास्त्रीय नृत्याचेही धडे इथे दिले जातील. तर म्युझिक स्टुडिओमध्ये दोन सेक्शन करण्यात आले आहेत. एक म्हणजे प्लेबॅक सेटअप आणि दुसरा कॅरी ओके सेटअप प्लेबॅक सेट अप हा प्रोफेशनली गाणी रेकॉर्ड करण्यासाठी वापरता यईल. यामध्ये चित्रपट, अल्बम यांचे संपूर्ण रेकॉर्डिंग करता येईल, तसेच नवोदित व हौशी कलकरांनाही इथे आपली गाणी रेकॉर्ड करता येतील. तर कॅरी ओके सेटअप सेट हा छोट्या कार्यक्रमांसाठी, कीटी पार्टीसाठी किंवा कॉर्पोरेट इवेंट्ससाठी वापरात आणता येईल. येथे लाईव्ह म्युझिशिएन सपोर्ट देखील मिळू शकेल असे विशाल आरोरा यांनी सांगितले.

आगामी काळात स्वयंपूर्ण व सुसज्ज अशी अॅक्टिंग आणि फिल्म मेकिंग इंन्स्टिट्यूट सुरू करण्याचा मानस असल्यानेचे

यावेळी आरोरा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *