ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन -

ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

श्री ज्ञानेश्वर महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन निमित्त अलंकापुरी नगरीत धार्मिक ज्ञानयज्ञ

आळंदी / प्रतिनिधी : पुणे आळंदी या पालखी मार्गावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात

श्रीगुरू निवृत्तींनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रा व श्री ज्ञानेश्वर माऊली व श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ति प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिना निमित्त अखंड हरिनाम सप्ताह अंतर्गत तपपूर्ती सोहळ्याचे आयोजन

८ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका

मंदिर देवस्थांन ट्रस्टचे अध्यक्ष अॅड विष्णू तापकीर , खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.

सप्ताहाचे काळात महापूजा व काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, श्री गाथा भजन, महिला भजनी मंडळाची भजने ,हरिपाठ,

हरिकीर्तन व हरी जागर असे कार्यक्रम होणार आहेत. या शिवाय मान्यवर कीर्तनकार यांची कीर्तन सेवा संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहेत.

यामध्ये प्रसाद महाराज माटे , सतीश महाराज काळजे, ज्ञानेश्वर महाराज कदम गुरुजी, संतोष महाराज काळोखे, विश्वनाथ महाराज मस्के, संजय महाराज कावळे,

विष्णू महाराज केंद्रे, अशोक महाराज साखरे, चंद्रकांत महाराज वांजळे, डॉ.रविदास महाराज शिरसाट यांच्या काल्याचे कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे.

त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अॅड विष्णू तापकीर यांनी दिली. सप्ताहात सहभागी होवून लाभ घ्यावा असे आवाहन तापकीर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.