जेधे फाऊंडेशनने १६०० जणांना दिली भोजन सेवा -

जेधे फाऊंडेशनने १६०० जणांना दिली भोजन सेवा

जेधे सोशल वेलफेअर फाउंडेशनच्यावतीने पुण्यातील गरजू तसेच देवदासींना भोजन वाटप करण्यात येत आहे. आत्तापर्यंत १६०० नागरिकांना भोजनसेवा देण्यात असून ३१ मे पर्यंत हे वाटप सुरू राहणार आहे. भोजन वाटप करताना फाऊंडेशनचे कार्यकर्ते.


जेधे फाऊंडेशनने १६०० जणांना दिली भोजन सेवा
जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन ; ससून रुग्णालय, पुणे स्टेशनसह देवदासींना भोजन

पुणे : जेधे वेलफेअर फाउंडेशनच्यावतीने पुण्यातील बेघर आणि लॉकडाऊनमुळे ज्यांचे रोजगार बंद झाले आहेत, अशा नागरिकांना भोजनसेवा देण्यात येत आहे. आतापर्यंत १६०० लोकांना अन्नवाटप करण्यात आले आहे, यापुढे ३१ मे पर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे.

उपक्रमामध्ये जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. रूचा जेधे, कान्होजी जेधे, ओमकार कदम, अर्जुन जेधे, यश खंडेलवाल, प्रणव जेधे यांनी सहभाग घेतला. ससून हॉस्पिटल परिसर, पुणे स्टेशन परिसरासह देवदासी महिलांना भोजन सेवा देण्यात येत आहे.

कान्होजी जेधे म्हणाले, कोरोना महामारीमुळे अनेकांवर संकट कोसळले आहे, कमाईचे साधन नसल्यामुळे दोन वेळच्या अन्नाची देखील भ्रांत पडत आहे. यासाठी जेधे वेलफेअर फाउंडेशनच्यावतीने अन्न वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ससून हॉस्पिटल भागात तसेच बुधवार पेठेत देवदासींना अन्न वाटप करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.