जगामध्ये अस्तित्वात आहेत जीवजंतूंच्या अशाही प्रजाती -

जगामध्ये अस्तित्वात आहेत जीवजंतूंच्या अशाही प्रजाती

‘अमीथिस्ट स्टार्लिंग’ पक्षी

आपण राहतो ते जग अतिशय सुंदर आणि अनेक आश्चर्यांनी परिपूर्ण आहे. या जीवजंतूंचा संपर्क मनुष्यांशी आला आणि या जीवजंतूंची ओळख जगाला झाली. त्यापैकी एक ‘अमीथिस्ट स्टार्लिंग’ नामक सुंदर पक्षी आहे. हे पक्षी मुख्यतः झाडांवर राहत असून, जमिनीवर क्वचितच उतरून येतात. अतिशय देखणा, जांभळ्या रंगाचा हा पक्षी अफ़्रिकेमधे सापडतो. या पक्ष्याला स्थानिक भाषेमध्ये ‘व्हायोलेट स्टार्लिंग’ किंवा ‘प्लम कलर्ड स्टार्लिंग’ असे ही म्हटले जाते. या पक्ष्यांचा प्रजातीमध्ये नर रंगेबिरंगी असून, मादी मात्र भुऱ्या रंगाची असते.

‘पापिलीयो अँड्रोजियस’ नामक फुलपाखराची प्रजाती दुर्मिळ असून, हे फुलपाखरू ‘बायलॅटरल जिनँड्रोमॉर्फ’ या पद्धतीमध्ये मोडणारे आहे, म्हणजेच हे एकच फुलपाखरू अर्धे नर आणि अर्धे मादी आहे. ‘पपिलिओनिडे’ या फुलपाखरांच्या जातीतील ही प्रजाती आहे. ही प्रजाती मेक्सिको, आर्जेन्टिना, फ्लोरिडा आणि आसपासच्या परिसरांमध्ये आढळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *