गड तिथे शिवराज्याभिषेक दिन, गड तिथे शिवस्वराज्यदिन' उपक्रमांतर्गत ५१ गडांवर उभारली स्वराज्यगुढी -

गड तिथे शिवराज्याभिषेक दिन, गड तिथे शिवस्वराज्यदिन’ उपक्रमांतर्गत ५१ गडांवर उभारली स्वराज्यगुढी

पुण्यातील शिवजयंती महोत्सव समितीच्या पुढाकाराने गड तिथे शिवराज्याभिषेक दिन, गड तेथे शिवस्वराज्य दिन या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ५१ गडांवर भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.


‘गड तिथे शिवराज्याभिषेक दिन, गड तिथे शिवस्वराज्यदिन’ उपक्रमांतर्गत ५१ गडांवर उभारली स्वराज्यगुढी-
पुण्यातील शिवजयंती महोत्सव समितीचा अभिनव उपक्रम : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असा उपक्रम

पुणे : गड तिथे शिवराज्याभिषेक दिन, गड तिथे शिवस्वराज्यदिन उपक्रमांतर्गत महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमता: राज्यातील तब्बल ५१ गडांवर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक, शिवस्वराज्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक गडांशी निगडीत असलेल्या वीर स्वराज्यघराण्यांचे वंशज आणि परिसरातील ग्रामस्थ, वीर मावळे यांच्या हस्ते हा सोहळा दिमाखात पार पडला. फुलांची तोरणे, रांगोळ्या आणि तुतारीच्या निनादाने गडांवरील वातावरण शिवमय झाले होते.

पुण्यातील शिवजयंती महोत्सव समितीच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. शिवस्वराज्यदिन सोहळ्याचे संकल्पक तसेच शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी गड तिथे शिवस्वराज्यदिन ही संकल्पना मांडली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला प्रतिसाद मिळाला. अभिनव उपक्रमात कंक, जेधे, गोळे, ढमाले, जगताप, कोकाटे, मरळ, ढमढेरे, शिर्के, शिळीमकर, धुमाळ, बांदल, थोपटे, सणस, कोंडे, मालुसरे, बलकवडे, गायकवाड, जाधव, शिंदे, देसाई, पवार, चव्हाण, हांडे, माने, राऊत, कदम, काशिद या वीर स्वराज्यघराण्यांचे वंशज, ढोरे, सातपुते, थरकुडे, उधाने या वीर मावळ्यांसह परिसरातील सर्व ग्रामस्थ मंडळींनी सहभाग घेतला.

शिवनेरी, तोरणा, राजगड, सिंहगड, रायरेश्वर, तुंग-तिकोणा, पुरंदर, रोहिडेश्वर, पन्हाळा, रामशेज, संग्रामदुर्ग, लोहगड, रोहिडा, मल्हारगड, विसापुर, चाकण, राजमाची, विसापुर, इंदूरी, मोरगिरी, कोरीगड, धनगड, कैलासगड, तैलबैला, सोनेरी, वज्रगड, केंजळगड, मोहनगड, कावळा, वैराटगड, चंदनगड, वंदनगड, कमळगड, पांडवगड, कलनिधी, विशाळ गड, भुदरगड, सामान गड, भैरवगड, जीवधन, वसंतगड, दौलतमंगळ, मांजरशुभा, पावन गड, निंबाळकर भुईकोट, गोविंदगड, दावडी भुईकोट, भुलेश्वर मंदिर या गडांवर सोहळा साजरा करण्यात आला.

अमित गायकवाड म्हणाले, शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंचशुभ चिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक स्वराज्यगुढी ५१ गडांवर उभारण्यात आली. पुढच्या वर्षी महाराष्ट्राबाहेरील ५१ गडांवर देखील स्वराज्यगुढी उभारली जाणार आहे. या संकल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार जाऊन गडांवर स्वराज्यगुढी उभारली. दिनांक ६ जून स्वराज्यदिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही ६ जून २०१३ साला पासून भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, शहरात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत.

कार्यक्रमाचे आयोजन सोहळयाचे संकल्पक अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती गोळे, रवींद्र कंक, गणेश जाधव, समीर जाधवराव, अशोक सरपाटील, प्रवीण गायकवाड, संतोषराजे गायकवाड, दिग्विजय जेधे, सागर पवार, राजेश सातपुते यांसह असंख्य स्वराजबांधवांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *