खासदार गिरीश बापट यांच्या मागणी ला यश -

खासदार गिरीश बापट यांच्या मागणी ला यश

राज्य परिवहन कार्यलायत आंदोलन करताना खासदार बापट व रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी

खासदार गिरीश बापट यांच्या मागणी ला यश
पुणे २०:करोना काळात रिक्षाचालकांच्या खात्यात रुपये १५०० जमा करण्याचे राज्य सरकार ने मागच्या महिन्यात जाहीर केले होते परंतु अद्याप पर्यंत रिक्षा चालकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकार ने केले.
काल खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्या मानधनातून सुमारे ३८० रिक्षा चालकांना १५०० रुपये दिले व कालच राज्य सरकारला जागे करण्यासाठी मूक आंदोलनाचा इशारा दिला होता त्याप्रमाणे आज प्रादेशिक परिवहन कार्यालयात खासदार बापट हे रिक्षा चालकांना घेऊन ठिया आंदोलनाला बसले होते
या वेळी लवकरात लवकर पैसे रिक्षा चालकांच्या खात्यात जमा करावेत असे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अजित शिंदे यांच्या कडे देण्यात आले
याचीच दखल घेऊन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने सुमारे १८० कोटी रुपये राज्य परिवहन विभागा कडे वर्ग केल्याचे ट्विट केले उशिरा का होईना पण सरकारला शहाणपण सुचले आता लवकरात लवकर रिक्षा चालकांना त्यांचे हक्काचे पैसे मिळावेत अशी सूचना खासदार बापट यांनी केली
या आंदोलनाला नगरसेवक उमेश गायकवाड, रिक्षा संघटनेचे बाबा कांबळे, बापू भावे , बादशहा सैयद ,माजी नगरसेवक उज्वल केसकर ,पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष स्वरदा बापट ,पुष्कर तुळजापूरकर ,सतीश मोहोळ यांच्या सह विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *