केळगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी अक्षय मुंगसे बिनविरोध -

केळगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी अक्षय मुंगसे बिनविरोध

केळगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी अक्षय मुंगसे बिनविरोध

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील केळगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी अक्षय दादाभाऊ मुंगसे यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच निवडीसाठी झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी सरपंच गुंफाबाई दिलीप ठाकर यांनी काम पाहिले.

या निवडी प्रसंगी ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका भारती म्हेत्रे यांनी निवडणूक प्रसंगी प्रशासकीय कामकाज पाहिले. यावेळी सभेला ग्रामपंचायत सदस्य नामदेव मुंगसे,हरिष मुंगसे, किरण मुंगसे, लताबाई वीरकर, रूपाली मुंगसे, सरपंच गुंफाबाई ठाकर उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच अक्षय मुंगसे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य माजी सरपंच सोमनाथ मुंगसे, पांडाशेठ मुंगसे, विशाल गुंड,शिवाजी मुंगसे, विठ्ठल मुंगसे, गुलाब मुंगसे आदि उपस्थित होते. उपसरपंच पदाचे एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी सहा सदस्य निवडणूक प्रक्रियेस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *