कारगिल विजय दिनानिमित्त प्रांत पोलीस मित्र संघाचा मानवंदना व पुष्पचक्र समर्पण कार्यक्रम -

कारगिल विजय दिनानिमित्त प्रांत पोलीस मित्र संघाचा मानवंदना व पुष्पचक्र समर्पण कार्यक्रम

कारगिल विजय दिनानिमित्त प्रांत पोलीस मित्र संघाचा मानवंदना व पुष्पचक्र समर्पण कार्यक्रम

आज शुक्रवार दिनांक 30/7/2021 रोजी खान्देश मराठा मंडळ प्राधिकरण याठिकाणी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने कारगिलच्या युद्धात आपल्या प्राणांची आहुती देत भारत मातेच्या चरणी कारगिल युद्धातील विजय समर्पित केला अशा वीर शहीद जवानांना व कोणाच्या काळात कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलीस बांधवांना प्रांत पोलीस मित्र संघ व रोटरी क्लब ऑफ पूणे कॉस्मोपॉलिटन यांच्या संयुक्त विद्यमाने शहिदांना पुष्पचक्र समर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
त्यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री प्रशांत जी अमृतकर म्हणाले की पोलीस किंवा सैनिक आपले प्राणांचे बलिदान देत आपल्या देशाचे मातृभूमीचे व आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचे संरक्षण करीत असताना देशातील नागरिकांनाही आपली एक जबाबदारी आहे.त्यामुळे सैनिकांना व पोलिसांना कर्तव्याची ताकद मिळते. नागरिकांच्या सहकार्यातून पोलिस आपले कर्तव्य बजावत असताना एक उत्कृष्ट कामगिरी करू शकतो त्यामुळे वेळोवेळी पोलीस प्रशासनास प्रांत पोलीस मित्र संघ सारख्या संस्थांची पोलिसांना कायमच मदत होत असते. नागरिक व पोलीस यांनी एकत्रितपणे आपले कर्तव्य बजावले तर कायदा व सुव्यवस्था राखणे कामी अत्यंत महत्वपूर्ण असे योगदान ठरेल.
वरील कार्यक्रमासाठी कारगिल युद्धाचे अत्यंत सखोल असे वास्तविक वर्णन मेजर जनरल नायर यांनी केले.
वरील कार्यक्रमासाठी
मेजर जनरल नायर
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर
टाटा मोटरचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रसादजी फुलगिरकर
राष्ट्रीय अध्यक्ष प्रांत पोलीस मित्र संघ गोपाल बिरारी निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खराडे गुन्हे विभाग
रोटरी क्लब ऑफ पुणे चे अध्यक्ष शरद जोशी
खानदेश मराठा मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील वेट्रन्स इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष भोलानाथ सिंग उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य
संदीपजी पोलकम
उपाध्यक्ष पुणे जिल्हा प्रशांतजी कुलकर्णी
वीरपत्नी सौ मीनाक्षी शिरीष भिसे सामाजिक कार्यकर्ते अजित संचेती
नारी सेना अध्यक्ष शुभांगी सरोते
स्मिता माने
श्रुती गावडे
वरील कार्यक्रमासाठी सतीशजी आचार्य
सुशेन बिरारी राजेंद्र कुंवर नितीन ढमनंगे नितीन चिंचवडे लक्ष्मण पाटील एकनाथ अहिरे यांनी विशेष परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मंजिरी कुलकर्णी प्रास्ताविक गोपाल बिरारी यांनी केले व आभार प्रदर्शन मेजर प्रतापजी भोसले यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *