कलावंत टाळ्यांचा भुकेला बालगंधर्व व अन्य नाट्यगृह कमी क्षमतेने सुरू करा - आबा बागुल -

कलावंत टाळ्यांचा भुकेला बालगंधर्व व अन्य नाट्यगृह कमी क्षमतेने सुरू करा – आबा बागुल

पुणेकरांचे लसीकरण जलदगतीने करण्यासाठी 353 नाही तर 302 घ्यायचीही तयारी - आबा बागुल

कलावंत टाळ्यांचा भुकेला बालगंधर्व व अन्य नाट्यगृह कमी क्षमतेने सुरू करा – आबा बागुल

सध्याच्या कोरोना काळात शासन व पुणे महानगरपालिकेकडून जी विविध बंधने लादली गेली. त्यामुळे पुण्यातील कोरोना स्थिती बरी झाली असून अजून जरी कोरोना बरा झाला नसला तरी जनजीवन सुरळीत सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. या काळात बालगंधर्व रंगमंदिरसारखे व अन्य नाट्यगृह कमी संख्येने का होईना सुरू करावे. त्यामुळे कलावंतांना रोजगार मिळेल असे नाही तर कलावंत हे टाळ्यांचा भुकेले असतात. नाट्यगृह बंद असल्याने हजारो कालावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे सर्व संसार यावरच चालतात त्यांना सावरण्यासाठी तसेच आज पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत हजारो सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी करणारे पुणेकर हे गेल्या दीड वर्षे कार्यक्रमांपासून वंचित आहेत. त्यांची सांस्कृतिक भूक भागत नाही. हा सर्वच बाबतीत परिणाम झाला आहे. हे लक्षात घेऊन 26 जून रोजी बालगंधर्व रंगमंचाचा वर्धापनदिन आहे. त्या दिवसापासून तरी किमान 25 किंवा 50 टक्के क्षमतेने बालगंधर्व रंगमंदिर व अन्य नाट्यगृह सुरू व्हावे अशी विनंती राज्य शासन व पुणे महानगरपालिकेकडे आबा बागुल यांनी केली आहे.

या संदर्भात सन्माननीय पालकमंत्री अजित पवार यांनी नाट्यगृह व मॉल्स अजून सुरू होऊ शकत नाही त्याचा निर्वाळा दिलाय मात्र अजून 10 दिवसात कोरोनाचा प्रभाव आणखी कमी होत गेला. तर बालगंधर्व रंगमंदिर व अन्य नाट्यगृह सुरू तरी करावेत. यातून नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवावी. व हजारो कलावंतांच्या उपजीविके विषयी शासन योग्य विचार करेल अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.