औचित्य गुरुपौर्णिमेचे साधले…गुरूंना वंदन आम्ही केले… -

औचित्य गुरुपौर्णिमेचे साधले…गुरूंना वंदन आम्ही केले…

औचित्य गुरुपौर्णिमेचे साधले
गुरूंना वंदन आम्ही केले… (गणेश राऊत शिवबांचा छावा )
शिवणे :- आज गुरुपौर्णिमा याचे औचित्य साधत नवभारत हायस्कूल शिवणे येतील सर्व शिक्षकांचा गुरुपौर्णिमेनिमित्ताने ओम साई फौंडेशन संस्थापक अध्यक्ष सुर्यकांतजी सकपाळ व वारसा विचारांचा गणेश राऊत शिवबांचा छावा यांच्या वतीने वारकरी संप्रदायाचे सचिव मा. सुभाष भाऊ मोरे व मा. दिपकजी गरुड (ऍडम ऑफिसर M.E.S.) यांच्या हस्ते दहा गुरुवर्यांना गुलाबाचे फुल व पेन भेट स्वरूपात देत यथोचित असा सन्मान करण्यात आला
या सन्मानामध्ये शाळेच्या प्राचार्या सौ. लोयरे मॅडम, उपप्राचार्य श्री पिंगळे सर, पर्यवेक्षक श्री कुंभार सर, पर्यवेक्षिका सौ. मिसाळ मॅडम, श्री. खुंटवड सर, सौ. सावंत मॅडम, सौ. पायगुडे, सौ. गिरमे,सौ. केळकर, श्री. वाघमोडे, श्री. कदम, श्री. मुजुमळे या सर्व गुरुवर्यांना सन्मानित करण्याचा आजचा आनंद वेगळाच होता
1975 चे विद्यार्थी वयाने आमच्यापेक्षा ही मोठे परंतु ते आज आमचा सन्मान गुरुपौर्णिमेनिमित्ताने करत आहेत याचा गर्व वाटला तसेच विद्यार्थी कितीही मोठा असला मग तो पदाने असो वा वयाने तो विद्यार्थीचं असतो आणि आज असे विद्यार्थ्यां शाळेत येऊन गुरुपौर्णिमा साजरी करत आहेत याचा अभिमान वाटला अस मत शाळेच्या प्राचार्या सौ. लोयरे मॅडम यांनी व्यक्त केले
शाळेच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून जो काही सन्मान केला गेला म्हणून श्रीमती. मीनाक्षी रघुनाथ मिसाळ यांनी शिग्र कविता लिखाण करत आभार व्यक्त केले….
अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन निलेशजी इंगळे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published.