ओबीसी आरक्षणाकरीता भाजपा ओबीसी मोर्चाचे 'आक्रोश आंदोलन'- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ; आरक्षण आमच्या हक्काचं… चा नारा -

ओबीसी आरक्षणाकरीता भाजपा ओबीसी मोर्चाचे ‘आक्रोश आंदोलन’- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ; आरक्षण आमच्या हक्काचं… चा नारा

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षणासंदर्भात आक्रोश आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी व ठाकरे सरकारचा निषेध करीत त्यांच्यामुळेच ओबीसी आरक्षणाबाबत अशी स्थिती झाली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला


ओबीसी आरक्षणाकरीता भाजपा ओबीसी मोर्चाचे ‘आक्रोश आंदोलन’
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ; आरक्षण आमच्या हक्काचं… चा नारा

पुणे : आरक्षण आमच्या हक्काचं… उठ ओबीसी जागा हो एकजुटीचा धागा हो… ओबीसी के सन्मान मे भाजपा मैदान में… अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर तर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी व ठाकरे सरकारचा निषेध करीत त्यांच्यामुळेच ओबीसी आरक्षणाबाबत अशी स्थिती झाली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी आघाडी अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी मोर्चा पुणे शहरचे अध्यक्ष योगेश पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, प्रदेश सचिव व प्रभारी अनुप सूर्यवंशी, वर्षा डहाळे, धनंजय जाधव, तुषार रायकर, ओंकार माळवदकर, दिनेश नायकु, दीपक माने, वासुदेव भोसले, संतोष शिंदे, बापू नाईक, यशोधन आखाडे, शंतनु नारके, अमोल पांडे, बंडू कचरे, निलेश घोडके, विशाल केदारी, विकी ढोले, दिनेश रासकर, स्मिता गायकवाड, सतिश शिरवाळे, विकास पवार, नंदकुमार गोसावी, रोहन कोद्रे, भास्कर राऊत, दादा कोद्रे, पंकज गिरमे आदी उपस्थित होते.

योगेश पिंगळे म्हणाले, महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणा-या अतिरिक्त राजकीय आरक्षणासंदभार्तील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देखील महाविकास आघाडी सरकार बाजू मांडण्यास अपयशी ठरले असून ओबीसी आरक्षणाबाबतही तीच स्थिती झाली आहे. त्यामुळे आता यापुढे ओबीसी समाज शांत बसणार नाही. महाविकास आघाडी, ठाकरे सरकारने जनतेची दिशाभूल केली असून त्याविरोधात भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चा आक्रोश आंदोलन करीत आहे.

  • फोटो ओळ : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षणासंदर्भात आक्रोश आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी व ठाकरे सरकारचा निषेध करीत त्यांच्यामुळेच ओबीसी आरक्षणाबाबत अशी स्थिती झाली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.