ओऍसिस फर्टीलिटी तर्फे मला आई व्हायचंय या मोहिमेस  सुरुवात -

ओऍसिस फर्टीलिटी तर्फे मला आई व्हायचंय या मोहिमेस  सुरुवात

ओऍसिस फर्टीलिटी तर्फे मला आई व्हायचंय या मोहिमेस  सुरुवात

  पुणे २७ एप्रिल २०२२ : राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह २०२२ व ओऍसिस फर्टीलिटीच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने “मला आई व्हायचंय” हि ओऍसिस फर्टीलिटीने महिलांना मातृत्वाच्या प्रवासात साथ देण्याच्या उद्देशाने एक खास मोहीम सुरू केली.या उद्घाटन प्रसंगी पुणे मा. महापौर श्री मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष स्थानी तर पुणे प्रसूती व स्त्रीरोग संस्थेचे अध्यक्ष डॉ पराग बिनीवाले, भारतीय वैद्यकीय संघटना, पुणे (IMA) चे अध्यक्षा डॉ मीनाक्षी देशपांडे, ज्ञानप्रबोधिनी चे मुख्य मार्गदर्शक सौ सविता आणि विवेक कुलकर्णी, इतिहास संशोधक श्री पांडुरंग बलकवडे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब भेलके व श्रीमती नलिनी बलकवडे हे विशेष अतिथी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजक ओऍसिस फर्टीलिटीचे क्लिनिकल हेड डॉ नीलेश उन्मेश बलकवडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ओऍसिस फर्टीलिटी च्या डॉ भारती खोलापुरे, डॉ. कांचन दुरुगकर,डॉ सायली चव्हाण या देखील उपस्थित होत्या.  

या प्रसंगी सुप्रसिद्ध संगीतकार, गायक डॉ सलील कुलकर्णीचा मातृत्वास स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि ५ गरजू विद्यार्थीना “उन्मेष” शिष्यवृती देण्यात आली. “मला आई व्हायचंय” या  मोहिमेच्या  अंतर्गत आयव्हीएफसाठी येणाऱ्या रुग्णांना मोफत मार्गदर्शन करण्यात येते आणि  त्यांचे रजिस्ट्रेशनदेखील  करण्यात येते.  आणि ट्रीटमेंटमधील पहिली सोनोग्राफी हि मोफत स्वरूपात करण्यात येते. वंध्यत्वामुळे अनेक स्त्रिया ह्या नैराश्येत जातात त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केले जाते . मला आई व्हायचंय” या मोहिमे मार्फत वंध्यत्वाबद्दलची जनजागृती व गुणवत्तापुर्ण उपचार देण्याचा ओऍसिस फर्टीलिटीचा मानस आहे.जनजागृतीच्या माध्यमातून तंत्रज्ञान हे जनमाणसांपर्यंत पूर्ण पोहोचणं अतिशय गरजेचं आहे .

जनजागृतीच्या माध्यमातून ओऍसिस मार्फत   पुणे आणि पुणे परिसरातील शिरूर , राजगुरुनगर , लोणावळा , इंदापूर  या भागात वंध्यत्व आणि त्याच्या उपचार पद्धती याविषयी मोहीम राबवण्यात येतात .  पालकत्व हा प्रत्येकाच्या आयुष्यातील हा एक अनोखा आणि अविस्मरणीय अनुभव असतो. मात्र वैद्यकीय समस्येमुळे अनेकांचे मूल होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. अशा पालकांना मुल होण्यासाठी योग्य उपचार मिळणे गरजेचे असते. अनेक प्रयत्न करूनही मुल न होत असलेल्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यात पुण्यातील ओॲसिस फर्टिलिटी हे महाराष्ट्रातील प्रजनन उपचारातील एक अग्रणी क्लिनिक म्हणून २०२० पासून कार्यरत आहे. या दोनच वर्षात प्रगत प्रजनन उपचार आणि तंत्रज्ञानाद्वारे अनेक जोडप्यांचे पालकत्वाचे स्वप्न या क्लिनिकने  पूर्ण केले आहे. प्रजनन विशेषज्ञ आणि क्लिनिकचे प्रमुख डॉ. नीलेश उन्मेष बलकवडे, यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली पुणे आणि खराडी येथे क्लिनिकच्या 2 शाखा कार्यरत आहेत. 

क्लिनिकच्यामाध्यमातून १००० हून अधिक जोडप्यांना त्यांचे कुटुंब तयार करण्यात मदत करण्यात आली आहे.  प्रजनन तज्ञ, उत्कृष्ट भ्रूणशास्त्रज्ञ, जागतिक दर्जाच्या इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) लॅब आणि अद्ययावत उपकरणांच्या अत्यंत चांगल्या टीमसह सेन्टरने महाराष्ट्रातील अनेकांना पालकत्वाचा आनंद भेट दिला आहे. या सर्वांमध्ये त्यांना डॉ भारती खोलापुरे, डॉ. कांचन दुरुगकर,डॉ सायली चव्हाण यांची मोलाची साथ मिळत आहे .जोडप्यांना त्यांच्या पालकत्वाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हजारो यशोगाथांसह ओॲसिस फर्टिलिटीने अनेक उपक्रम, नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी विविध कार्यक्रम आणि सल्ला शिबिरे सुरू केली आहेत.  #WeCanConceive (#वी कॅन कन्सइव्ह) अशी एक मोहीम आहे, जी वंध्यत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जोडप्यांना त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासात समर्थन देण्यासाठी गेल्या वर्षी सुरू करण्यात आली होती.

पुरुषांना त्यांचे पितृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैयक्तिकृत निदान आणि उपचार देण्यासाठी अँड्रोलाइफ (AndroLife) हे एक स्वतंत्र पुरुष फर्टीलिटी  क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. “मला आई व्हायचंय” या मोहिमे मार्फत वंध्यत्वाबद्दलची जनजागृती व गुणवत्तापुर्ण उपचार देण्याचा ओऍसिस फर्टीलिटीचा मानस आहे.वंध्यत्वावर मात करीत पालकत्व मिळण्यासाठी उपचार आणि प्रक्रिया ओऍसिस फर्टीलिटी हे जोडप्यांना पुरवते.  इलेक्ट्रॉनिक विटनेसिंग सिस्टीम (इडब्सल्यूएस) बीज शुक्राणू तसेच गर्भाचे शीत संरक्षण हे अद्यावत तंत्रज्ञान येथे उपलब्ध आहे. फर्टिलिटी प्रिझर्व्हेशन टेक्नॉलॉजी, कर्करोगाच्या रुग्णांना कर्करोगाच्या उपचारापूर्वी त्यांची प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच त्यांना त्यांच्या सोयीनुसार भविष्यात गर्भधारणा करण्यास सक्षम करते. अनुवांशिकदोष  निवारणासाठी प्रीप्लांटेशन आनुवंशिक चाचणी (पीजीटी-ए)  प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग) हे आणखी एक प्रगत तंत्र आहे  हे मुलांना पालकांकडून होणाऱ्या आनुवंशिक विकारांचे हस्तांतर रोखण्यास मदत करते.

“मला आई व्हायचंय”  या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ओएसिस फर्टिलिटीचे क्लिनिकल हेड डॉ निलेश बलकवडे म्हणाले,- “आम्ही संशोधन, नैतिकता आणि ममत्व यांच्याआधारे उत्कृष्ट उपचार आणि काळजी पुरविण्यासाठी वचनबद्ध आहोत. आहार, व्यायाम पथ्ये, औषधोपचार, शस्त्रक्रिया इत्यादींचा समावेश असलेल्या सर्वांगीण प्रयत्नामुळे प्रजनन उपचारात मोठे यश मिळवता आले आहे.  आम्ही TESE(टी.इ.एस.इ) TESA  (टी.ई.एस.आ) इ सारख्या अत्याधुनिक प्रक्रिया देखील पुरवतो.  त्याद्वारे आम्ही ज्या जोडप्यांमध्ये पुरुष जोडीदाराचे शुक्राणूंची संख्या कमी असते अशा जोडप्यांना देखील  मूल झाल्याचा आनंद देतो, असे ओॲसिस फर्टिलिटीचे क्लिनिकल प्रमुख आणि प्रजनन विशेषज्ञ डाॅ. नीलेश उन्मेष बलकवडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.