एनपीएसटी ने सुलभ व वेगवान व्यवहारांसाठी टाइम पे मर्चंट पीएसपी विकसित केले -

एनपीएसटी ने सुलभ व वेगवान व्यवहारांसाठी टाइम पे मर्चंट पीएसपी विकसित केले

एनपीएसटी ने सुलभ व वेगवान व्यवहारांसाठी टाइम पे मर्चंट पीएसपी विकसित केले

पुणे २८ जून २०२१ : विविध बँकांचे तंत्रज्ञान भागीदार असणाऱ्या तसेच बँकांना डिजिटल पेमेंट्स सोल्युशन्स ,टेक्नोलॉजी सर्व्हिस प्रोवायडर म्हणून, मोबाइल बँकिंग, आयएमपीएस, भीम यूपीआय आणि वॉलेट प्लॅटफॉर्म पुरवणारे एक प्रमाणित सोल्युशन विकसित करणाऱ्या एनपीएसटी या प्रख्यात कंपनीने कॅनरा बँक, कॉसमॉस बँक, कर्नाटक ग्रामीण बँक आणि केरळ ग्रामीण बँक आदी बँकांच्या टेक्नोलॉजी सर्व्हिस प्रोव्हायडरने संस्था व अतिस्थानिक व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंट्स डिलिव्हर करण्यासाठी टाइमपे हा मर्चंट पीएसपी विकसित केले आहे.

टाइमपे हे सोल्युशन इनव्हॉइसिंग, संकलन, गेटेड सिक्युरिटी, डेटा इंटेलिजन्स, लेखापालन यांचे स्वयंचलित प्रक्रियांमार्फत डिजिटायझेशन करण्यासाठी व त्यायोगे अतिस्थानिक परिसंस्था तयार करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. यामुळे सूक्ष्म, छोट्या व मध्यम व्यापाऱ्यांना, पेमेंट्स, ऑपरेशन्स व व्यवसाय वाढीसाठी, डिजिटल सोल्युशन्स वापरण्यास सक्षम केले जाऊ शकते.तसेच ऑनलाइन पेमेंट्स, बिलिंग आणि इनव्हॉइसिंग, स्वयंचलित लेखापालन अभ्यागत व्यवस्थापन ,डिजिटल कम्युनिकेशन, वापरकर्त्यांचे ऑनबोर्डिंग , केवायसी व्यवस्थापन, तक्रार व्यवस्थापन, कस्टमर कनेक्शन इ. सुविधांचा लाभ टाइमपे या मर्चंट द्वारे वापरकर्ते घेऊ शकतात .

सर्व समुदायांमध्ये अतिस्थानिक सेवांचा उपयोग व पुरवठा व्हावा म्हणून वापरकर्ते व व्यापारी यांच्यात सामाईक प्लॅटफॉर्म तयार केला असून त्याची बांधणी हि विविध सोल्युशन्स द्वारे केली गेली आहे.यात प्रामुख्याने पेमेंट सोल्युशन या सोल्युशन्स मुळे व्यापाऱ्यांना ऑनलाइन अस्तित्त्व निर्माण करण्यात तसेच वेगवान एपीआय एकात्मीकरणांच्या माध्यमातून पेमेंट्सचे संकलन/वितरण करण्यात मदतहोते. अपार्टमेंट सोल्युशन मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे सोसायटीची कामे, संकलन, पार्किंग, अभ्यागत, सुरक्षा व सदस्यांच्या तक्रारी यांचे व्यवस्थापन करण्यास मदत करते मर्चंट बिझनेस सोल्युशन हे व्यवसाय डिजिटाइझ करता यावा , या दृष्टीने डिझाइन करण्यात आले आहे.

एनपीएसटी चे सीएमडी दीपक ठाकूर म्हणाले की संकलनातील समस्या दूर करणे व परवडण्याजोगा खर्च व अनुपालन यांबाबत मोठी आव्हाने असलेल्या सुक्ष्म अर्थव्यवस्थेसाठी वाढीची संभाव्यता निर्माण करणे यावर आम्ही प्रामुख्याने भर देत आहोत. डिजिटल व एकत्रित प्लॅटफॉर्म पुरवला गेल्यामुळे अतिस्थानिक बाजारपेठ व त्यांच्याशी जोडलेल्या समुदायाला या इंटेलिजंट प्रणालीचा लाभ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *