आसाम सीमेवरती तैनात असणाऱ्या जवानांना राख्या पाठवल्या -

आसाम सीमेवरती तैनात असणाऱ्या जवानांना राख्या पाठवल्या

नाते जिव्हाळ्याचे ….कार्य समृद्धीचे..
देशभर सर्वत्र रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना सीमेवर लढणारे आपली जवान आपल्यासाठी सीमेवरती लढत आहेत आणि या जवानांसाठी कृतज्ञतेचा भाव म्हणून डोनेट एड सोसायटी आणि माता रमाई बचत गटाच्या अध्यक्ष सारिका कृष्णा भंडलकर यांनी पर्यावरण पूरक सीड बॉल्स पासून बनवलेल्या राख्या पँरा कमांडो श्री रघुनाथ सावंत सर,श्री.प्रताप भोसले सर
सौ. स्मिता सुधीर माने या प्रतिनिधींकडे आसाम सीमेवरती तैनात असणाऱ्या जवान यांचेपर्यंत पोचवण्यासाठी सुपूर्त केल्या आहेत. यावेळेस डोनेट च्या अध्यक्षा सारिका भंडलकर यांनी पॅरा कमांडो श्री रघुनाथ सावंत सर यांना प्रातिनिधिक स्वरूपात राखी बांधून रक्षाबंधन केले. यावेळेस बचत गटातील पुढील प्रमाणे महिला उपस्थित होत्या.जयश्री परदेशी ,मंगला चव्हाण, शितल शीलवंत, माधवी गायकवाड, रिद्धी साबळे, डॉक्टर कांचन खरात, प्रिया सीदमल, वंदना दाभाडे,कोमल काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *