आळंदी परिसरात घरीच बुद्धजयंती साजरी -

आळंदी परिसरात घरीच बुद्धजयंती साजरी

आळंदी परिसरात घरीच बुद्धजयंती साजरी
आळंदी (अर्जुन मेदनकर): करोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभुमीवर आळंदी शहर व
परिसरात साधेपणाने घरोघरीच बुद्धजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त बुद्धमुर्तीचे पुजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन धम्म वंदना घेत बौद्ध बांधवांनी बुद्धजयंती साजरी केली. तसेच ऑनलाईन पद्धतीने एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात साधेपणाने बुधवारी (दि. २६) बुद्धजयंती साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे डॉ. नीलेश रंधवे यांनी बुद्धमुर्तीचे पुजन केले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. अगदी मोजक्‍या बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
चऱ्होली खुर्द येथील भीम आर्मी तनिश सृष्टीच्या वतीने सर्व बौद्ध उपासक-उपासिकांनी सोसायटीच्या आवारातील हॉलमध्ये बुद्धजयंती साजरी न करताप्रत्येकाने घरीच साध्या पद्धतीने बुद्धजयंती साजरी केली, अशी माहिती बाळासाहेब खरात यांनी दिली.
करोनाच्या पार्श्‍वभुमीवर बुद्धजयंती घरीच साजरी करुन, आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शाखेने केले होते.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आळंदी परिसरातील बौद्ध बांधवांनी घरीचबुद्धवंदना घेत, गोडधोड जेवण करत, बुद्धजयंती साजरी केली. तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे जिल्हा पश्‍चिम विभागाच्या वतीने आयोजित केलेल्याधम्मप्रबोधन ऑनलाईन प्रवचन मालिकेत बौद्ध बांधवांनी मोठा सहभाग नोंदविला.
बुद्धजयंतीच्या शुभेच्छांचे मेसेज सकाळ पासूनच सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *