आळंदीत २५० वारकरी विद्यार्थ्याना किराणा साहित्याचे कीट वाटप -

आळंदीत २५० वारकरी विद्यार्थ्याना किराणा साहित्याचे कीट वाटप

आळंदीत २५० वारकरी विद्यार्थ्याना किराणा साहित्याचे कीट वाटप
वारकरी शिक्षण संस्थेचा एक हात मदतीचा
आळंदी (अर्जून मेदनकर ) : येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आळंदीत कीर्तन, प्रवचन तसेच शालेय शिक्षणासह वारकरी सांप्रदायिक शिक्षणासाठी आलेल्या वारकरी विद्यार्थ्याना लॉकडाउन काळात वारकरी विद्यार्थ्याना सुमारे एक महिना पुरेल इतके अन्नधान्य, किराणा साहित्य सामाजिक बांधिलकी जोपासत सुपूर्द करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्स , आरोग्य विषयक नियमांचे काटेकोर पालन करीत सामाजिक बांधीलकीतून एक हात मदतीचा किराणा किट वाटप करीत सेवा कार्य रुजू करण्यात आले.वारकरी शिक्षण संस्थेचे जेष्ठ अद्यापक शांतिब्रम्ह मारुती महाराज कुरेकर यांचे मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी वारकरी साधकांना आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, दैनिक पुण्यनगरीचे प्रसाद शिंगोटे, वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे, सचिव नाना महाराज चंदिले, विश्वस्त अप्पाबुवा पाटील महाराज , आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, आळंदी पोलिस ठाण्याचे गुप्त वार्ता विभागाचे मच्छीन्द्र शेंडे या प्रमुख मान्यवरांचे हस्ते किटचे वाटप करण्यात आले.
या वेळी आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, पत्रकार विलास काटे,अर्जून मेदनकर,उल्हास महाराज सूर्यवंशी, माणिक महाराज मुखेकर शास्त्री, व्यवस्थापक तुकाराम बुवा मुळीक, उमेश बागडे, अर्जुन बुवा बिराजदार, योगेशबुवा साळुंके, भीमसेन शिंदे, राजेंद्र होन्नर , अविनाश महाराज, हरिश्चंद्र महाराज यांचेसह साधक वारकरी उपस्थित होते .

कोविड १९ संदर्भातील शासनाचे नियम व बंधने पाळत आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी संप्रदायचे शिक्षण घेत असलेल्या तसेच माजी विद्यार्थी अशा सुमारे २५० साधक, वारकरी यांना संस्थेच्या वतीने किराणा साहित्य किटचे वाटप उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. याशिवाय उर्वरित इतर गरजू साधक वारकरी यांना संस्थेच्या भंडार गृहातून किराणा साहित्याचे अत्यावश्यक वस्तूंचे किट देण्यार येणार आहेत. यावेळी कार्यक्रमास खेडचे आमदार दिलीप मोहिते येणार होते. मात्र येता न आल्याने त्यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.   

स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था १०४ वर्षांपासून आळंदीत वारकरी सांप्रदायिक शिक्षण देत आहे. यातून हजारो कीर्तनकार, प्रवचनकार तयार केले आहे. संस्थेतील शिक्षकांस पगार नाही तसेच मुलांना फी नाही. अशी एकमेव शिक्षण संस्था म्हणून या वारकरी शिक्षण संस्थेची वेगळी ओळख असल्याची माहिती संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे यांनी सांगितली. यावेळी संस्थेच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. ते म्हणले कोरोंना या महामारीचे संकट काळात सर्वत्र सेवाभावी संस्था तसेच नागरिक समाजातील गरजूंना जमेल तशी मदत करीत आहेत. याच भावनेतून वारकरी शिक्षण संस्थेने यापूर्वी तीन वेळा अशा प्रकारे वारकरी विद्यार्थी व साधकांना जीवनावश्यक धान्य व किराणा साहित्य किट देवून संस्थेने एक हात मदतीचा उपक्रम संस्थेच्या अन्नपूर्णा निधीतून राबविला. यावर्षी हा चौथा उपक्रम असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी आळंदीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव,प्रसाद शिंगोटे यांचा संस्थेचे वतीने सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री निधीला एक लाख धनादेश सुपूर्द

वारकरी शिक्षण संस्थेने कोरोंना महामारीचे संकटात राज्य शासनास मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देखील एक लाख रूपयांचा धनादेश खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे हस्ते पुण्याचे पालक मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती खजिनदार भालचंद्र नलावडे यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *