आळंदीत मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी -

आळंदीत मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी

आळंदीत मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी

आळंदी (अर्जुन मेदनकर ) : पराक्रमाचे धनी, श्रीमंत सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांच्या जयंती निमित्त अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान,आळंदी नगरपरिषद वृक्ष पाधिकरण,आळंदी जनकल्याण फाउंडेशनसह विविध सेवाभावी संस्थांचे वतीने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे प्रतिमा पूजन व पुष्पहार संजय महाराज कावळे यांचे हस्ते अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

१६ मार्च १६९३ साली मल्हाररावांचा जन्म झाला. त्याचं गाव पुणे नजीकचं ‘होळ’. या गावावरून त्यांना होळकर हे नाव मिळाले . धनगर कुटुंबात जन्मलेले मल्हारराव हे कोणत्याही घराणेशाहीचा आधार न घेता आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठेशाहीचे आधारस्तंभ बनले. तो काळच पराक्रमाचा होता. तुमच्यातलं शौर्य तुमची ओळख बनत असे. मल्हारराव होळकर यांची जयंती विविध ठिकाणी साजरी करण्यात आली.

याप्रसंगी विशेष कार्यकारी अधिकारी भागवत काटकर, आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे सचिव अर्जुन मेदनकर, आप्पा चिताळकर, गंगाराम घुंडरे, भागवताचार्य संजय महाराज कावळे, ओमकार महाराज वैद्य, उत्तरेश्वर महाराज फुगणर, आसाराम महाराज सुसलादे, श्रीराम गडदे, चंद्रकांत चांदणे, माऊली निळे आदि उपस्थित होते.

यावेळी भागवत काटकर म्हणाले , हा योद्धा त्याच्या कर्तुत्वाने मराठा साम्राज्यातील एक महत्वाचा सरदार बनला. पेशवाई ज्यांनी आपल्या भक्कम हातांवर तोलून धरली त्या होळकर आणि शिंदे घराण्यांपैकी होळकर घराण्याची स्थापना करणारा हा मूळ पुरुष.श्रीमंती सुभेदार मल्हारराव होळकर हे अटकेपार झेंडा रोवण्यापासून ते पानिपतच्या निर्णायक लढाई पर्यंत मराठा साम्राज्यासाठी लढत राहिले. एक महत्वाची व्यक्ती म्हणून इतिहास त्यांना कधीही विसरणार नाही असे यावेळी बोलताना आळंदी नगरपरिषद वृक्ष प्राधिकरण सदस्य भागवत काटकर यांनी कार्याची ओळख करून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *