आळंदीत प्रजासत्ताक दिन विविध सामाजिक उपक्रम आणि माबि प्रतिज्ञा घेवून साजरा -

आळंदीत प्रजासत्ताक दिन विविध सामाजिक उपक्रम आणि माबि प्रतिज्ञा घेवून साजरा


आळंदी / प्रतिनिधी : ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आळंदीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

उपक्रमात ध्वजारोहण, वृक्षारोपण, शोभिवंत फुलझाडांचे वाटप, अन्नदान आणि माबि प्रतिज्ञा सांघिक वाचन करण्यात आले.

श्री पद्मावती देवी मंदीर बागेत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी देवस्थानाचे विश्वस्त विकास ढगे पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पर्यावरण अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर, दत्तात्रय गायकवाड, सचिन गायकवाड,

प्रल्हाद भालेकर, अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर घुंडरे, आदर्श गिड्डे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी जैविक आक्रमणाविरोधी “मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि)” बाबतच्या हरित प्रतिज्ञेचे सांघिक वाचन देखील केले.

त्याचबरोबर वै. पांडुरंग महाराज गायकवाड यांच्या स्मरणार्थ मान्यवरांच्या हस्ते सोनचाफा, जास्वंद, जाई व इतर देशी झाडांचे रोपण मंदिर परिसरात करण्यात आले.

आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर यांच्या तर्फे शोभिवंत फुलांची ३०० रोपे मंदिर परिसरात लावण्यासाठी

मंदिर व्यवस्थापनाला सुपूर्त करण्यार आली, जेणेकरून भविष्यात या फुलांचा उपयोग माउलींच्या नित्य पूजनासाठी करता येईल.

  आळंदीतील गोपाळपुर येथे वै. पांडुरंग महाराज गायकवाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आळंदी जनकल्याण फाऊंडेशन संचलित 

अन्नदान अन्नछत्रात साधकांना दत्तात्रय महाराज गायकवाड व परिवारातर्फे अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी साधकांनी माबि प्रतिज्ञा घेतली.

हनुमंत खाडे महाराज यांच्या हस्ते अन्नछत्रात मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी विश्वस्त गजानन महाराज लाहुडकर आणि डॉ. सचिन पुणेकर यांनी

साधकांशी हरित संवाद साधला.संयोजन आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर,सचिव अर्जुन मेदनकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *