आर्थिक मदत जाहीर न केले मुळे मुंडण निषेध आंदोलन - महेश सांगळे -

आर्थिक मदत जाहीर न केले मुळे मुंडण निषेध आंदोलन – महेश सांगळे

गेली 5 महिने सलून व पार्लर व्यवसाय बंद असुन ही शासनाने आर्थिक मदत जाहीर न केले मुळे मुंडण निषेध आंदोलन.

1)राज्य शासनाने दि.13 एप्रिल रोजी काही दुर्बल घटकांस मदत जाहिर केली. छान स्वागतार्य निर्णय आहे. परंतू याच सहानुभूतीने ज्या व्यवसायीकांचे जाहिर पणे व्यवसाय बंद केले त्यास ही मदत द्यावी.
2) पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने सर्व व्यवसायीकांस आर्थिक मदत जाहिर केली. त्याच धर्तीवर पुणे महानगर पालिकेने ही सर्व व्यवसायीकांस या लॉकडाऊन काळात अर्थिक मदत द्यावी.
3) माझ्या सर्व सामान्य 20 सलून व्यवसायीकांने लॉक डाऊन मुळे आत्महत्या केलेली आहे. लॉक डाऊनचे 5 महिने शासनाचे सर्व आदेश आम्ही सलून व्यावसायिकांने पाळले असून देखील. आत्महत्या ग्रस्त सलून व्यावसायिकांस काही मदत नाही.
4) स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्र शासनाकडे बोट दाखवत आहे. महाराष्ट्र शासन केंद्र सरकार कडे बोट दाखवत आहे. आणि केंद्र सरकार कोणालाच मदत देत नाही . कारण RBI कडे ठेवलेली आपतकालीन ठेव केंद्र सरकारने खर्च केल्याच्या बातम्या सोशल मिडीया मधून ऐकल्या व पाहिल्या आहेत.
5) एकी कडे अर्बन क्लॅप सारख्या मोठ्या कंपन्या घरी जाऊन सलुन काम करीत आहे व औरंगाबाद मधील सामान्य सलून व्यवसायीकाचा कारवाई दरम्यान प्राण जात आहे.
6) या शासनासन व शासकीय अधिकारी यांस आमचा प्रश्न आहे की, आपण पाच महिने पगार न घेता घर चालू शकता का ?
7) या सर्व सलून व्यावसायिकांचे प्रश्नांकडे केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन , महानगर पालिका , नगर पालिका, जिल्हा पंचायत समिती, ग्रामपंचाय यांचे लक्ष जावे या करीता हे टक्कल करून सलून व्यवसायीकास मदत देणे साठी विचार करण्याचे आवाहन आम्ही करीत आहेत.
8) हे मुंडण आंदोलना हे शासनाने सलून दुकाने सुरु करणे परवानगी साठी नसून शासनाने सलून व्यवसायीकसा मदत जाहीर करणे साठी करीत आहोत.
आपले नम्र
महाराष्ट्र नाभिक महामंडळ व पुणे शहर सर्व नाभिक संघटना,
पुणे शहर व जिल्हा कार्यकारीणी.

Leave a Reply

Your email address will not be published.