आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार -

आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

महासंवाद

आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘सेवा कमतरता विश्लेषण’ योजनेंतर्गत  खरेदी केलेल्या वैद्यकीय उपकरणांच्या  प्रदर्शनाची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Team DGIPR by Team DGIPR

 मे 27, 2022

in sliderTickerजिल्हा वार्तापुणेवृत्त विशेष

Reading Time: 1 min read

 0

आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

पुणे दि.२७- प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ‘सेवा कमतरता विश्लेषण’ (गॅप ॲनालिसिस) योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेल्या या उपकरणांमुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक भक्कम आणि बळकट होण्यास होईल. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेचे हे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

विधानभवन येथे पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ‘गॅप ॲनालिसिस’ योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या उपकरणांच्या प्रदर्शनाची पाहणी श्री.पवार यांनी केली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, जिल्हा परिषदेचा स्वनिधी, सामाजिक संस्थांनी केलेली मदत, उद्योग क्षेत्राच्या सामाजिक दायित्व निधीतून आरोग्यसेवेसाठी आवश्यक असलेल्या या उपकरणांची खरेदी करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात स्थानिक पातळीवरच अद्ययावत उपचार उपलब्ध करून देणे शक्य होईल आणि गोरगरिबांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल. जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था सक्षम करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.