आगामी निवडणुकीत "डिजिटल कार्यकर्त्यां"मुळे मिळेल नवसंजीवनी -

आगामी निवडणुकीत “डिजिटल कार्यकर्त्यां”मुळे मिळेल नवसंजीवनी

आगामी निवडणुकीत “डिजिटल कार्यकर्त्यां”मुळे मिळेल नवसंजीवनी

पुणे/ प्रतिनिधी : कोणत्याही नेत्याला त्याच्या इच्छित स्थळी पोचविण्यासाठी दिवसरात्र कार्यकर्ता सातत्याने प्रयत्न करत असतो. आजच्या डिजिटल जगात कार्यकर्ते देखील नेत्यांप्रमानेच स्मार्ट होणे अपेक्षित असते. सोशल मीडिया हे असे माध्यम आहे की ज्यातून नेता आणि कार्यकर्ता हे एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतात. यासाठीच सोशल मीडियावर नेता व कार्यकर्ता या दोघांनाही सोशल मीडियावर आपला वावर अधिक स्मार्ट करणे अपेक्षित आहे. याचं पार्श्वभूमीवर पुणे येथे १० एप्रिल २०२२ रोजी डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे येथील कावेरी मीडिया आणि बॅनियन ट्रीज सोल्युशन यांच्या वतीने राज्यातील आगामी निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी एकदिवसीय “डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर”चे आयोजन केले आहे. रविवार दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी द कोरोनेट हॉटेल, आपटे रोड, डेक्कन जिमखाना, पुणे येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. संपूर्ण शिबिर मातृभाषा मराठीमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरात प्रात्यक्षिकासह मागर्दर्शन करण्यात येणार असून फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्स ॲप, यूट्यूब माध्यम सोप्या पद्धतीने हाताळणे, ग्राफ़िक डिज़ाइन बनविने, ऍनिमेशन वीडियो बनवने, Bulk SMS, Bulk ई-मेल, Bulk व्हाट्सएप मार्केटिंगच्या पद्धती, कमी खर्चात वेबसाइट बनवणे, फेसबुक पेज, स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट, डेटाबेस बनविणे, अपडेट करणे, Ads बनविणे – Content मार्केटिंग, Social media – सोप्या आणि नवीन मार्केटिंग पद्धती, – ऑटोमेशन, Blogging, Image Editing, Search Engine Optimization. [SEO] आदी घटकांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कार्यशाळेत सर्व पक्षाचे नेते, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते, तरुण – तरुणी, महिला, लघु, मध्यम व्यवसाईक, उद्योजक आदींना सहभागी होता येणार आहे.

कार्यशाळेत डिजिटल मार्केटिंग तज्ञ पुष्कर मालवणकर (संचालक मालवणकर बिझनेस एंपायर ) आणि ऑनलाईन डिजिटल एक्स्पर्ट मयूर गलांडे (सब एडिटर : ऑनलाईन लोकमत) शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिरात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/tPkcrpoyAAL7HnVn7 या लिंकला भेट द्या किंवा 9011122680, 9850577550 या नंबर वर संपर्क साधू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.