अमलदार सेवानिवृत निरोप समारंभ -

अमलदार सेवानिवृत निरोप समारंभ


पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून पोलीस अधिकारी, अमलदार सेवानिवृत झाले आहेत त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रमाचे आज रोजी आयोजन पोलीस आयुक्त कार्यालयात करण्यात आले होते , माहे फेब्रुवारी व एप्रिल २०२१ या मध्ये एकूण ५ पोनि , ०४ पोउनि, १८ पोलीस अमलदार असे एकुण पोलीस अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त झालेले आहेत. तसेच माहे में २०२१ मध्ये सेवानिवृत्त झालेले एकूण ४ रापोजा, १ पोनि , २ सपोनि , १० पोउनि , ५८ पोलीस अमलदार , २ पोलीस अधिकारी अमलदार सेवानिवृत्त झालेले आहेत . सदर कार्यक्रमाकरीता मा पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, मा सह पोलीस आयुक्त श्री रवींद्र शिसवे, मा अपर पोलीस आयुक्त प्रशासन श्री. जालिंदर सुपेकर , मा.पोलीस उप – आयुक्त मुख्यालय श्रीमती स्वप्ना गोरे, मा . पोलीस उप – आयुक्त , विशेष शाखा श्री मितेश घट्टे ही सर्व अधिकारी उपस्थित होते . सदर कार्यक्रमाकरीता उपस्थित निक पोलीस अधिकारी अमलदार यांना मा.पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता यांनी शाल श्रीफळ भेटवस्तु देवुन त्यांचा सत्कार केला . तसेच पुढील आयुष्याकरीता शुभेच्छा देवुन त्यांचे आभार मानले . तसेच मा पोलीस आयुक्त पुणे याचेतर्फ अल्पोपहाराचा कार्यक्रम आयोजित करुन सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *