अभिनेत्री, गायिका पुष्पा चौधरी यांनी केला सलग 25 लावण्या गाण्याचा विक्रम -

अभिनेत्री, गायिका पुष्पा चौधरी यांनी केला सलग 25 लावण्या गाण्याचा विक्रम

अभिनेत्री गायिका व सामाजिक कार्यकर्त्या सौ पुष्पा चौधरी यांनी दिलासा सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी बालगंधर्व येते नुकताच 12 ऑक्टोबरला 25 सलग मराठी ठसकेदार लावण्या गाण्याचा विक्रम केला .तीन तासात त्यांनी या पंचवीस लावण्या सादर केल्या. या कार्यक्रमाला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लावणीसम्राज्ञी आशाताई तारे या सुद्धा पुष्पाताईंना शुभेच्छा द्यायला आल्या होत्या. तसेच देव माणूस या झी मराठी वरच्या सिरीयल मधल्या सरुआजी म्हणजेच रुक्मिणी सुतार या साताऱ्यावरून त्यांच्या मुलीला म्हणजेच वंदी आत्याला शुभेच्छा द्यायला आल्या होत्या. उत्कृष्ट वाद्य वृंदा सोबतच सुप्रसिद्ध नर्तक किरण कोरे ,फिरोज मुजावर यांच्यासह दहा नृत्यांगणांनी खूप सुंदर लावण्यांचा आविष्कार केला. बालगंधर्व रंग मंदिर हाउसफुल झाले होते. हा कार्यक्रम ऐच्छिक मूल्य होता.
पुष्पा ताईंना विचारले असता त्या म्हणाल्या की जुन्या पारंपारिक लावण्या लोकांच्या नजरेआड होत चालल्या आहेत .लावण्या गाण्यांचा कार्यक्रम कधीच केला जात नाही. एक तर लावणी नृत्याचा कार्यक्रम होतो .नाहीतर गाण्यांचा कार्यक्रम होतो. परंतु लावणी गाण्यांचा कार्यक्रम कधीच झाला नाही म्हणून सलग 25 लावण्या गाण्याचा हा विक्रम करायचा मी निर्णय घेतला आणि तो यशस्वीरित्या पार सुद्धा पडला. इतर गाणी सहजरीत्या गायली जातात परंतु लावणी गाण्यासाठी खूप स्टॅमिना आणि भारदस्त आवाजाची गरज असते आणि स्वामीं समर्थांच्या कृपेने या दोन्ही गोष्टी माझ्यात आहेत.
लवकरच पुष्पाताई सलग 50 मराठी ठसकेबाज लावण्या गाण्याचा रेकॉर्ड ब्रेक विक्रम करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *