'अन्नसुरक्षा' उपक्रमांतर्गत लालबत्ती परिसरातील गरजूंना शुक्रवार पेठ पोलीस चौकीजवळ अन्नदान व लहान मुलांसाठी दुधवाटप -

‘अन्नसुरक्षा’ उपक्रमांतर्गत लालबत्ती परिसरातील गरजूंना शुक्रवार पेठ पोलीस चौकीजवळ अन्नदान व लहान मुलांसाठी दुधवाटप

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असणा-या बुधवार पेठ, पुणे येथे रेड लाईट एरियात शेकडो
महीला वेश्याव्यवसाय करुन आपली उपजिवीका करतात. मागील वर्षी महाराष्ट्र राज्य तसेच देशात
कोरोनाची साथ आल्यानंतर वेश्याव्यवसाय करणा-या महीलांचा व्यवसाय जागीच थांबला. व्यवसाय
थांबल्यामुळे अर्थातच त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहीला. मागील वर्षी देशात जाहीर करण्यात
आलेल्या लॉकडाऊन दरम्यान पुणे शहरातील अनेक संस्थानी पुढाकार घेऊन रेड लाईट भागातील
महीलांचे पालकत्व घेतले. त्यामुळे त्यांचे काही अंशी जीवन सुखकर झाले. यावर्षी मा. मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिनांक ०२/०४/२०२१ रोजीपासुन महाराष्ट्र राज्यात अंशतः लॉकडाऊन
जाहीर केल्याने सदर महीलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. तेव्हा फरासखाना पोलीस
स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र लांडगे यांनी पुणे शहरातील सामाजीक संस्थाना संपर्क
साधुन वेश्याव्यवसाय करणा-या महीलांकरता अन्नधान्य तसेच अत्यावश्यक सेवा पुरवण्याबाबत अवाहन
करण्यात आले. फरासखाना पोलीस स्टेशनकडुन करण्यात आलेल्या आवाहनास प्रतिसाद देत दिव्यांग
इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज पुणे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे व उद्योजक
दानेश शाह व परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठ पुणे येथील वेश्याव्यवसाय करणा-यामहीलांना दिनांक १८/०४/२०२१ रोजीपासुन दररोज दुपारी फुड पॅकेट व त्यांच्या मुलांकरता दुधाचे वितरण करण्यात येत आहे. तसेच आज दिनांक २१/०४/२०२१ रोजी साधुवासवानी ट्रस्ट पुणे यांच्याकडुन वेश्याव्यवसाय करणा-या महीलांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त,(पश्चिम प्रादेशिक विभाग)पुणे शहर डॉ. संजय शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस स्टेशन श्री राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) श्री. राजेश तटकरे, पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील, श्रीकांत सावंत,व साधु वासवानी ट्रस्टचे प्रकाश साधवानी, विजय तलरेजा व स्वयंसेवक, उदयोजक दानेश शाह, राहुल शाह, दिव्यांग इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष श्री रघुनाथ येमुल गुरुजी व परिवार, प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे चे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे हे हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *