अन्नदान मधुकरी वाटप उपक्रमास उपनगराध्यक्ष सागरशेठ बोरुंदिया यांची सदिच्छा भेट ; वारकरी साधकांना तिळगुळ वाटप व अन्नदान -

अन्नदान मधुकरी वाटप उपक्रमास उपनगराध्यक्ष सागरशेठ बोरुंदिया यांची सदिच्छा भेट ; वारकरी साधकांना तिळगुळ वाटप व अन्नदान

अन्नदान मधुकरी वाटप उपक्रमास उपनगराध्यक्ष सागरशेठ बोरुंदिया यांची सदिच्छा भेट ;
वारकरी साधकांना तिळगुळ वाटप व अन्नदान
आळंदी / प्रतिनिधी : तिर्थक्षेत्र आळंदीचे वैभव असलेल्या गोपाळपुरात आळंदी जनकल्याण फाऊंडेशन तर्फे श्री मुक्ताई माऊली अन्नछत्र आळंदी निवासी वारकरी साधकांसाठी सुरु करण्यात आले आहे. या आळंदी अन्नछत्र उपक्रमास मकर संक्रांत दिनी आळंदी नगरपरीषदेचे उपनगराध्यक्ष युवा उद्योजक सागरशेठ बोरुंदिया यांनी सदिच्छा भेट देऊन उपक्रमाची माहिती जाणुन घेतली.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर यांचे हस्ते उपनगराध्यक्ष सागरशेठ बोरुंदिया यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी फाऊंडेशनचे सचिव पत्रकार अर्जुन मेदनकर, विश्वस्त गजानन महाराज लाहुडकर, ज्ञानेश्वर घुंडरे, अनिल कारेकर, दशरथ चौरे, विजय पांडव, सागर महाराज लाहुडकर यांचेसह वारकरी साधक उपस्थित होते. यावेळी मकर संक्रांती निमित्त तिळगुळ वाटप करीत हरीनाम गजरात आळंदी अन्नछत्राचे वतीने श्री मुक्ताई माऊली मधुकरी अन्नदान वाटप झाले. यावेळी उपनगराध्यक्ष सागरशेठ बोरुंदिया यांनी उपस्धित साधकांना शुभेच्छा दिल्या.
मकर संक्रांत दिनी दशरथ चौरे , विजय पांडव यांचे तर्फे अन्नदान, फाऊंडेशन तर्फे साधकांना तिळगुळ अन्नदान मधुकरी वाटप सेवा झाली. यावेळी अन्नदान तिळगुळ वाटप उपनगराध्यक्ष सागरशेठ बोरुंदिया यांचे हस्ते करुन नामजय घोषात अन्नदान, तिळगुळ वाटप करण्यात आले. या प्रसंगी पदाधिकारी , मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *