अन्नदानाच्या सेवेसाठी स्वयंसेवक म्हणून पुढे यावे - गुरुजी रघुनाथ येमुल -

अन्नदानाच्या सेवेसाठी स्वयंसेवक म्हणून पुढे यावे – गुरुजी रघुनाथ येमुल

कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीमध्ये सर्वत्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत यामुळे गोर गरीब जनतेचे हाल होऊ नयेत यांना दोन वेळचं अन्न मिळावं यासाठी तसेच दिव्यांग बांधवांना देखील दोन वेळचं अन्न मिळावं या दृष्टिकोनातून दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज पुणे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे तसेच अवनी संस्था पुणे यांच्या माध्यमातून आणि उद्योजक दानेश शहा आणि परिवार यांच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात गरीब व गरजू व्यक्तींना प्रसादम वाटप यावेळी करण्यात आलं यामध्ये फुड पॅकेट्स बरोबर व्हींटामिन सी गोळ्या ज्यामध्ये एक महिना पुरेल एवढे व्हीटामिन डी थ्री तसेच कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी मास्क असे किट देखील देण्यात आले हे वाटप फिरत्या टेंपो द्वारे स्वारगेट, भवानी पेठ परिसर, शिवाजीनगर, भागात मॉर्डन इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट कॉलेज रोड, शिवाजी नगर पुणे या ठिकाणी करण्यात आले मानवतेवर आलेल्या या संकटाच्या काळात आम्ही आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण पुढे येऊन या अन्नदानाच्या सेवेसाठी स्वयंसेवक म्हणून पुढे यावे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत अन्नदान करता येईल असे मत गुरुजी रघुनाथ येमुल यांनी केले या या अनुदानाच्या वाटप कार्यक्रमांमध्ये विश्वनाथ गोणे, डॉक्टर गजानन एकबोटे, डॉक्टर निवेदिता एकबोटे, संदीप शिरोळे, ऋषिकेश कोंढाळकर, सुरज दरेकर, सर्व मॉर्डन कॉलेज, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, अशोक अंकम, सीमा हुंडेकरी यांनी हातभार लावला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *