अखंड जनसेवेचे व्रत हाती घेतलेला जनसेवक/जन नायक विनोद भाऊ बेंगळे -

अखंड जनसेवेचे व्रत हाती घेतलेला जनसेवक/जन नायक विनोद भाऊ बेंगळे

पुणे,दि.२१/०४/२०२१
“नाव असे करा की काम झाले पाहिजे आणि काम असे करा कि नाव झाले पाहिजे” या वाक्याला तंतोतंत जुळणारे कार्य करणारा जनसेवक/ जन नायक म्हणजे उरुळी कांचन येथील विनोद भाऊ बेंगळे हे आहेत.सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला हा जनसेवक गेली अनेक वर्ष समाजातील वंचित,शोषित घटकांची तसेच सर्वसामान्य जनतेची अविरत सेवा करीत आहे.

क्षेत्र कोणतेही असो संपर्क साधला असता एका फोन मध्ये कोणता जिल्हा असो,राज्य असो किंवा देशात कोणत्याही ठिकाणी संपर्क केला जातो संबंधित व्यक्तीचे काम मार्गी लावले जाते असा हा जनसंपर्काचा महासागर असलेला सर्वांचा लाडका विनोद भाऊ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात व देशाबाहेरही संपर्क असलेला अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखला जाणारा जनरक्षक आहे.

युवा रक्षक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आता ते जनसेवेचे कार्य करीत आहेत अनेक लोकांना अनेक ठिकाणी कशी मदत करता येईल यासाठी त्यांचा दांडगा जनसंपर्क नेहमी कामी येतो. एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या जिल्ह्यात इतर राज्यात किंवा देशातील एखाद्या कानाकोपर्‍यात अपघात झाला असता त्याने संपर्क साधला असता त्याला त्या ठिकाणी काही वेळेतच काही, मिनिटातच मदत उपलब्ध करून दिले जाते,तसेच एखाद्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार झाला असेल त्याला देखील तेथील स्थानिक व्यक्तींशी संपर्क करून न्याय दिला जातो.

कोरोना महामारिच्या काळात अनेक लोकांना अनेक पद्धती तिची मदत उपलब्ध करून देण्यात यांचा मोठा वाटा आहे.लॉक डाऊन मध्ये अडकून पडलेल्या व्यक्तींना प्रवासाची सोय उपलब्ध करून देणे,गरजूंना अन्नधान्य उपलब्ध करून देणे,विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे उपलब्ध करून देणे, औषधे उपलब्ध करून देणे,हॉस्पिटल बाबतीत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे,हॉस्पिटल मिळवून देणे, ॲम्बुलन्स उपलब्ध करून देणे ई. कार्य त्यांच्या वतीने गेली वर्षभर अविरत चालू आहे.

सध्या कोरोनाने महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि जगात रुद्र रूप धारण केलेले आहे,अशा परिस्थितीत देखील जनसामान्यांच्या संपर्कात राहून जनसेवेचे त्यांचे कार्य अविरत चालू आहे.जो एखादा लोक प्रतिनिधी,एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता,आमदार,खासदार किंवा एखादा प्रशासकीय अधिकारी काम करू शकत नाही ते काम यांच्या जन संपर्कामुळे सहज रित्या करण्यात येते.
लोकांना हॉस्पिटल उपलब्ध करून देणे,ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणे,व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देणे,लागणारी औषध सामग्री उपलब्ध करून देणे,ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देणे इत्यादी कार्य रात्रंदिवस हा जनरक्षक करत असताना दिसत आहे.
आशा या लोकसेवकला,जनसेवकाला जन नायकला आमचा त्रिवार सलाम…

Leave a Reply

Your email address will not be published.